इंदापूर : माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. इंदापूर तालुक्यातील बावडा इथे दोन्ही नेत्यांची भेट झाली. मात्र ही सदिच्छा भेट होती, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
राजकारणातील आजच्या स्थितीमध्ये ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आम्ही आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचेच काम करणर असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकारातून इंदापूर शहरामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. ही नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर शरद पवारांनीही पाटील त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. या स्थितीत मोहिते पाटलांनी हर्षवर्धन पाटलांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबतच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील म्हणतात...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2019 07:29 PM (IST)
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर असलेली नाराजी लपून राहिलेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -