सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सांगलीतले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आज सांगलीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे निवडणुकीत हरणार असल्याचा दावा केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हरणार आहेत. परंतु त्या किती मतांच्या फरकाने हरतील हे प्रचारासाठी शिल्लक असलेल्या आगामी 15 दिवसांत स्पष्ट होईल.
सुप्रिया सुळे हरणार असल्चाचे चित्र दिसू लागल्यामुळेच शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात आपला प्रवास वाढवला आहे. पूर्वी शरद पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत प्रचार करायचे. या निवडणुकीत शरद पवारांना आपल्या मुलीच्या प्रचारासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे. शरद पवार आता आपल्या मुलीच्या प्रचाराला प्राधान्य देत आहेत. बाकिच्या उमेदवारांचा प्रचार नंतर करतील.
सुप्रिया सुळे यंदा लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, चंद्रकांत पाटलांचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2019 05:08 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -