नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 125 जागांची यादी जाहीर केली आहे. 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नाही. तसंच नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या गणेश नाईक यांना उमेदवारी न देता, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे.


भाजपची उमेदवार यादी

1. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
2. कोथरुड  - चंद्रकांत पाटील
3. शहादा  - राजेश पडवी
4. नंदूरबार  - विजयकुमार गावित
5. नवापूर - भारत गावित
6. धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती मनोहर भदाने पाटील
7. सिंदखेडा - जयकुमार रावल
8. रावेर - हरिभाऊ जावळे
9. भुसावळ - संजय सावकारे
10. जळगाव शहर - सुरेश भोळे
11. अंमळनेर -  शिरीष चौधरी
12. चाळीसगाव  मंगेश रमेश चव्हाण
13. जामनेर - गिरीश महाजन
14. मलकापूर - चैनसुख संचेती
15. चिखली - श्वेता महाले
16. खामगाव  - आकाश फुंडकर
17. जळगाव जामोद - डॉ. संजय कुटे
18. अकोट - प्रकाश भारसाकळे
19. अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा
20. अकोला पूर्व - रणधीर सावरकर
21. मूर्तिजापूर - हरिश पिंपळे
22. वाशिम - लखन मलिक
23. कारंजा - राजेंद्र पटनी
24. अमरावती - सुनील देशमुख
25. दर्यापूर - रमेश बुंदिले
26. मोर्शी - डॉ. अनिल बोंडे
27. आर्वी - दादाराव केचे
28. हिंगणघाट -  समीर कुणावार
29. वर्धा - डॉ. पंकज भोयर
30. सावनेर - डॉ. राजीव पोतदार
31. हिंगणा  - समीर मेघे
32. उमरेड - सुधीर पारवे
33. नागपूर दक्षिण - मोहन मते
34. नागपूर पूर्व -  कृष्णा खोपडे
35. नागपूर मध्य -  विकास कुंभारे
36. नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख
37. नागपूर उत्तर - डॉ. मिलिंद माने
38. अर्जुनी मोरगाव  - राजकुमार बडोले
39. तिरोरा - विजय रहांगदळे
40. आमगाव - संजय पुरम
41. आरमोरी - कृष्णा गजभे
42. गडचिरोली - डॉ. देवराव होळी
43. राजुरा - संजय धोटे
44. चंद्रपूर - नाना श्यामकुळे
45. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
46. चिमूर - किर्तीकुमार भांगडिया
47. वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार
48. राळेगाव - अशोक उईके
49. यवतमाळ - मदन येरावार
50. आर्णी - डॉ. संदीप धुर्वे
51. भोकर - बापूसाहेब गोरठेकर
52. मुखेड - डॉ. तुषार राठोड
53. हिंगोली - तानाजी मुटकुळे
54. परतूर - बबनराव लोणीकर
55. बदनापूर - नारायण कुचे
56. भोकरदन - संतोष दानवे
57.फुलंब्री - हरिभाऊ बागडे
58. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
59. गंगापूर - प्रशांत बंब
60. चांदवड - डॉ. राहुल आहेर
61. नाशिक मध्य - देवयानी फरांदे
62. नाशिक पश्चिम - सीमा हिरे
63. डहाणू - प्रकाश धनारे
64. विक्रमगड - हेमंत सावरा
65. भिवंडी पश्चिम - महेश चौगुले
66. मुरबाड - किसन कथोरे
67. कल्याण पूर्व - गणपत गायकवाड
68. डोंबिवली - रवींद्र चव्हाण
69. मिरा भाईंदर - नरेंद्र मेहता
70. ठाणे - संजय केळकर
71. ऐरोली - संदीप नाईक
72. बेलापूर - मंदा म्हात्रे
73. दहिसर - मनिषा चौधरी
74. मुलुंड - मिहिर कोटेचा
75. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
76. चारकोप - योगेश सागर
77. गोरेगाव  विद्या ठाकूर
78. अंधेरी पश्चिम  - अमित साटम
79. विले पार्ले - पराग आळवणी
80. घाटकोपर पश्चिम - राम कदम
81. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
82. सायन कोळीवाडा - कॅ. तमीळ सेल्वन
83. वडाळा - कालिदास कोळंबकर
84. मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
85. पनवेल - प्रशांत ठाकूर
86. पेण - रविशेठ पाटील
87. शिरुर - बाबुराव काशिनाथ पाचर्णे
88. इंदापूर - हर्षवर्धन पाटील
89. पिंपरी चिंचवड - लक्ष्मण जगताप
90. भोसरी - महेश किसान लांडगे
91. वडगाव शेरी - जगदीश मुळीक
92. शिवाजीनगर - सिद्धार्थ पद्माकर शिरोळे
93. खडकवासला - भीमराव तापकीर
94. पर्वती - माधुरी मिसाळ
95. हडपसर - योगेश टिळेकर
96. पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे
97. कसबा पेठ - मुक्ता टिळक
98. अकोले - वैभव पिचड
99. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
100. कोपरगाव - स्नेहलता कोल्हे
101. नेवासा - बाळासाहेब मुरकुटे
102. शेवगाव - मोनिका राजळे
103. राहुरी - शिवाजीराव कर्डिले
104. श्रीगोंदा - बबनराव पाचपुते
105. कर्जत जामखेड - राम शिंदे
106. गेवराई - अ‍ॅड. लक्ष्मण पवार
107. माजलगाव - रमेश आडसकर
108. आष्टी - भीमराव धोंडे
109. परळी - पंकजा गोपीनाथराव मुंडे-पालवे
110. अहमदपूर - विनायक किसन जाधव-पाटील
111. निलंगा - संभाजी निलंगेकर
112. औसा - अभिमन्यू पवार
113. तुळजापूर - राणा जगजितसिंग
114. सोलापूर शहर उत्तर - विजयराव देशमुख
115. सोलापूर शहर दक्षिण - सुभाष देशमुख
116. वाई - मदन भोसले
117. माण - जयकुंमार गोरे
118. कराड दक्षिण - अतुल भोसले
119. सातारा - शिवेंद्रराजे भोसले
120. कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
121. इचलकरंजी - सुरेश हळवणकर
122. मिरज - सुरेश खाडे
123. सांगली - सुधीर गाडगीळ
124. शिराळा - शिवाजीराव नाईक
125. जत - विलासराव  जगताप

या आमदारांचा पत्ता कट
मुलुंड - सरदार तारा सिंह
पुणे कॅन्टॉन्मेंट - दिलीप कांबळे
शिवाजी नगर - विजय काळे
कोथरुड - मेधा कुलकर्णी
माजलगाव - आर टी देशमुख
आर्णी - राजू तोडसम
विक्रमगड - विष्णू सावरा
शहादा - उदेसिंग पाडवी

विभागनिहाय भाजपचे उमेदवार
पश्चिम महाराष्ट्र - 37
उत्तर महाराष्ट्र - 11
विदर्भ - 38
ठाणे, मुंबई - 20
कोकण - 2
मराठवाडा - 17
एकूण - 125

युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर
भाजपच्या या यादीसोबतच शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना 124 जागांवर लढणार आहे. तसंच शिवसेनेला विधानपरिषदेच्या दोन अधिकच्या जागा दिल्या जातील. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्ष 164 जागांवर लढणार आहे.


VIDEO | मुख्यमंत्रिपदावरुन संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील काय म्हणाले? | ABP Majha