राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये



    1. संयुक्त पत्राद्वारे महायुतीची घोषणा, मात्र जागावाटपाचा सस्पेन्स कायम, उपमुख्यमंत्रिपदाचं ठरलं नसल्याचं चंद्रकांतदादांकडून स्पष्ट

    2. आदित्यच्या रुपात ठाकरे घराण्यातला पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, चंद्रयान 2 लँड झालं नसलं तरी मुख्यमंत्रीपदावर आदित्य ठाकरे बसणार, संजय राऊतांचं विधान

    3. जागांच्या अदलाबदलीची मागणी करत अनेक सेना इच्छुकांची खदखद चव्हाट्यावर, मातोश्रीवर तातडीची बैठक, संभाव्य बंडखोरी रोखण्याचं आव्हान

    4. युती झाल्यानंतरचे साईड ईफेक्ट दिसायला सुरुवात, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदारसंघ भाजपाला सोडल्याने 200 शिवसैनिकांचे राजीनामे

    5. भाजपप्रवेशानंतर गोपीचंद पडळकरांना अजित पवारांविरोधात बारामतीतून उमेदवारी, तर काट्यानं काटा काढणार म्हणत अजित पवारांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर






  1. उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्ष सोडून जाणं पक्षाचा अपमान, याचा बदला जनताच घेईल, धनंजय मुंडेंचा विश्वास

  2. पाच ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली सभा, यंदा कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष, मनसे 100 ते 120 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता

  3. उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु, साताऱ्यातून लोकसभेसाठी उदयनराजे तर विधानसभेसाठी शिवेंद्रराजे आज अर्ज भरणार, आघाडीचा मात्र लोकसभेचा उमेदवार ठरेना

  4. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लास्टिक पिशवीत आणल्याने उमेदवाराला पाच हजारांचा दंड,  अहमदनगरच्या नेवासामधील घटना

  5. अर्थशास्त्र सांभाळू शकत नाही ते सरकार पर्यावरणशास्त्र काय सांभाळणार? आरे मेट्रो कारशेडवरुन हायकोर्टानं फटकारले