Worli Vidhan Sabha Matadarsang : वरळी विधानसभा मतदारसंघ (Worli Assembly Election 2024) ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचा आहे. त्यासाठी कारणं म्हणजे, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सुपुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेतील (Shiv Sena) बंडानंतर पक्षात फूट पडली आणि तेव्हापासूनच वरळी विधानसभेवरुन राज्याच्या राजकारणात रणकंदन सुरू आहे. वरळी विधानसभेवरुन आधी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाक्ययुद्धामुळे वरळी मतदारसंघ चर्चेत आला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) वरळीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आगामी विधानसभेत आदित्य ठाकरेंचं आव्हान मोडण्यासाठी महायुतीकडून अटोनात प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीचा (Mahayuti) हुकुमी एक्का ठरल्याच्या चर्चा वरळीत सुरू आहेत. 


वरळी विधानसभेची (Worli Vidhan Sabha) लढत महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठी प्रतिष्ठेची असल्याचं बोललं जात आहे. आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा वरळीवर विजय मिळवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर, आदित्य ठाकरेंचं आव्हान संपवण्यासाठी महायुती आपला हुकुमी एक्का निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. अशातच सध्या महायुतीचा उमेदवार ठरल्याच्या चर्चा मतदारसंघात दबक्या आवाजात सुरू आहेत. आगामी विधानसभेसाठी महायुतीकडून भाजपच्या शायना एनसी निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. 


आदित्य ठाकरेंसमोर शायना एनसी यांचं आव्हान?


आगामी विधानसभेत आदित्य ठाकरेंसमोर शायना एनसी यांचं आव्हान असेल, असं बोललं जात आहे. त्यामुळे आता वरळी विधानसभेत चुरस रंगणार हे मात्र, नक्की झालं आहे. महायुतीच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार शायना एनसी वरळी विधानसभा मतदारसंघात सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात शायना एनसी आदित्य ठाकरेंसमोर विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शायना एन सी यांनी वरळी मतदारसंघातील सर्व महापालिका वॅार्डातील मतदारांशी संपर्क वाढवला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसमाजाच्या मतदारांशी शायना एनसी यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


जर अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील, तर मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार; 'या' नेत्यानं दंड थोपटले