Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Elections 2024) भाजप (BJP) 160 जागा लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ABP माझाला दिली आहे. भाजप गेल्यावेळी लढल्या तेवढ्याच जागा यंदाही लढणार असून त्यासाठी कंबर देखील कसल्याची माहिती मिळत आहे. कार्यकर्त्यांना लवकरात लवकर कामाला लागण्याच्या सूचना देखील पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आल्याची माहिती देखील भाजपमधील सर्वाधिक विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुका 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान, होण्याची शक्यता असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. 


10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक


10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 28 नोव्हेंबरच्या आधी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं, अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर किमान एक दिवस गॅप ठेवून मतमोजणी करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे हे लक्षात घेता, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे टप्पे 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


भाजप आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशिरा जाहीर केल्याचा फटका बसला होता. त्यामुळे यंदा भाजप उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना आधी देणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं विद्यमान खासदार आणि उमेदवारांच्या मतांना तेवढं लक्षात घेतलं नव्हतं, यंदा मात्र ती काळजी जास्त घेतली जाण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 23, 24 तारखेला बैठक तर 2 ऑक्टोबरनंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.                                                


पाहा व्हिडीओ : Mahayuti: महायुतीत 168 जागांवर कोणताही वाद नाही, 'एबीपी माझा'ला महायुतीतल्या वरीष्ठ नेत्यांची माहिती                                       



महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                                                                                      


कोकणात महाविकास आघाडीत जागांसाठी रस्सीखेच; 'या जागां'साठी जोरदार फिल्डींग!