जालना : मराठा आरक्षणासाठी (Marathi Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी शेवटी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) उडी घेतली आहे. त्यांनी आज (20 ऑक्टोबर) मराठा समाजासासमोर आपली भूमिका स्पष्ट केली असून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी त्यांनी उमेदवारांना अर्ज भरायला सांगितले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी जरांगे यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. याच तीन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जरांगे (Manoj Jarange) निवडणूक लढवणार आहेत. 


मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?


मनोज जरांगे यांनी मराठा समजाला संबोधित करत विधानसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले असून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करा असे निर्देश दिले आहेत. सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करताना नेमकी काय रणनीती असेल? याबाबतही जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, त्याच जागेवर जरांगे उमेदवार देणार आहेत. या निवडणुकीसाठी हा पहिला निकष असेल. सोबतच राज्यात जो मतदारसंघ राखीव आहे, त्या जागेसाठी जारांगे उमेदवार देणार नाहीत. सोबतच तिसरा निकष म्हणून जिथे उमेदवार उभा केला जाणार नाही, तिथे उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून 500 रुपयांच्या बाँडवर लिहून घेतले जाणार आहे. जो मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देईल, त्यालाच मतदान द्यावं, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. 


पाहा व्हिडीओ :



विरोधात भूमिका घेणाऱ्यांना पाडणार


मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात बोलताना विधानसभा निवडणुकीची रणनीतीदेखील सांगितली आहे. आपण उमेदवार देत असू तर विजयाचे समीकरण साधावे लागेल. माझे त्यासाठी बोलणे चालू आहे. सोबतच जो आपल्या विरोधात भूमिका घेईल त्याला पाडायचं आहे, असं जरांगी यांनी मराठा सामजाला उद्देशून म्हटलं आहे.


मुस्लीम धर्मगुरी, वकील, राजकीय तज्ज्ञांसोबत बैठका


दरम्यान, जरांगे यांनी ही भूमिका जाहीर करण्याआधी वकील, राजकीय अभ्यासकांसोबत बातचित केली आहे. त्यांनी 19 ऑक्टोबरच्या रात्री मुस्लीम धर्मगुरीची भेट घेत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. मुस्लीम धर्मगुरूंनी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर ते आपली भूमिका जरांगे यांना सांगणार आहेत. त्यामुळे जरांगे यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी नेमके कोणते डावपेच आखले आहेत? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा :


मोठी बातमी! मनोज जरांगेंची थेट निवडणुकीत उडी, निवडक ठिकाणी उमेदवार देणार; भूमिका केली जाहीर


महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवर नेमका तिढा काय आहे? नेमकं कुठे बिनसतंय?


मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाची 'या' एका जागेसाठी वेगळी भूमिका; मविआत वादाची ठिणगी?