पीएमसी बँकेचे सुमारे 17 लाख खातेदार आहेत, तर बँकेवर 11 हजार 500 कोटी रुपयांचं आर्थिक संकट आहे. बँकेत अनेकांची लाखो रुपयांची एफडी, सॅलरी अकाऊंट आहेत.
कोणत्या परिस्थितीत पैसे काढता येणार?
किरीट सोमय्या यांच्या ट्वीटनुसार, शिक्षण, आजारपण, यांसारख्या अत्यावश्यक गरजेसाठी पीएमसी बँकेचे खातेदार आता अतिरिक्त 50 हजार रुपए काढू शकतात. पैसे काढण्यासाठी खातेदारांना त्यांना बँकेच्या शाखेत अर्ज करावा लागेल. मेडिकल इमर्जन्सीसाठी खातेदारांना डॉक्टरने दिलेल्या अंदाजित खर्चाची माहिती द्यावी लागेल. मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल रिपोर्ट आणि उपचारांचं बिलही बँकेत जमा करावं लागलं.
पैसे काढण्याची मर्यादा किती वेळा वाढवली?
सर्वात आधी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा केवळ 1000 रुपये निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून 10,000 रुपये करण्यात आली होती. मग आरबीआयने 3 ऑक्टोबर रोजी बँक ग्राहकांना आपल्या खात्यातील जमा रकमेपैकी 25,000 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. यानंतर खातेदारांनी जोरदार गोंधळ घालत निषेध व्यक्त केल्याने आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आणि ती 40 हजार रुपये केली.
खातेदारांचा पैसा सुरक्षित : आरबीआय
दरम्यान, बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. 30 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत खातेदारांना निर्णयाची माहिती देण्यात येईल, असं आरबीआयने सांगितलं. यानंतर मुंबईतल्या आझाद मैदानात सुरु असलेलं पीएमसी खातेदारांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं.
संबंधित बातम्या