UP Assembly Election 2022 : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. मंगळवारी भाजप आणि समाजवादी पार्टीने यूपी निवडणुकांसाठी जाहीरनामे प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला मोठमोठी आश्वासने दिली आहेत. दरम्यान, आज काँग्रेस देखील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. आज दुपारी 1 वाजता लखनौच्या पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत.


दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये उद्या (गुरुवार) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातील पहिला टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी मतदान होणार असून, त्यापूर्वीच काँग्रेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. आज प्रसिद्ध करणाऱ्या जाहीरनाम्यात प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी नेमक्या कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



काँग्रेस जनेतला कोणती आश्वासने देऊ शकते?


महिलांसाठी 8 लाख नोकऱ्या
एका वर्षात 3 मोफत सिलेंडर
स्पर्धा परीक्षा 'शुल्क मुक्त'
परीक्षेसाठी मोफत प्रवास
विद्यार्थिनींना स्मार्ट फोन, स्कूटी
सर्वात मागासलेल्यांना 1 टक्के व्याज दराने कर्ज
शेतकरी कर्जमाफी
शेतकऱ्यांना 50 टक्के मोफत वीज
गरीब कुटुंबांना 25000 रुपये देण्याचे आश्वासन 
20 लाख सरकारी नोकऱ्या


अशी आश्वासने काँग्रेस आज प्रसिद्ध करणाऱ्या जाहीरनाम्यात देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यानंतर काँग्रेस जनतेचे मत परिवर्तन करण्यात यशस्वी होणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचा भर हा विशेषत: यूपीच्या महिला मतदारांवर आहे. ज्या नवीन सरकार बनवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळेच यूपीत 403 जागांवर एकाकी लढणाऱ्या काँग्रेसने 40 टक्के महिलांना तिकीट देऊन नवं राजकारण सुरू केलं आहे. अशा स्थितीत आज प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात मुलींसाठी मोठमोठ्या घोषणा, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठीही काही घोषणा करण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: