UP Election Result : देशाच्या सत्तासमीकरणात सर्वात महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आली आहे. पाच वर्षांपूर्वी मोठा विजय मिळवलेल्या भाजपला तिथं पुन्हा सत्ता मिळाली आहे. भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात एकाच वेळी दोन इतिहास रचले आहे. पहिला म्हणजे योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर बसणारे पहिले मुख्यमंत्री ठरले. तसेच जे मुख्यमंत्री आपल्या कार्यकालात नोएडाला भेट देतात त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत नाही हे मिथक देखील त्यांनी मोडलं. 

Continues below advertisement

काय आहे नोएडाचे मिथक? उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आणि नोएडाची भेट... ही एक विरोधाभासाची कथा आहे. जो मुख्यमंत्री त्याच्या कार्यकालात नोएडाला भेट देतो तो पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसत नाही, त्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत नाही असा समज आहे. त्यामुळे मुलायम सिंह यादव, राजनाथ सिंह आणि कल्याणसिंह यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नोएडाला भेट दिली नाही. 

मायावतींची नोएडा भेट आणि पद गेलंसन 2007 साली मायावतींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्या सतिश मिश्रा यांच्या एका नातेवाईकांच्या लग्नासाठी नोएडाला गेल्या होत्या. त्यानंतर 2102 साली त्यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला व्हावं लागलं होतं.

Continues below advertisement

अखिलेश यांदवांचे मुख्यमंत्रीपद गेलंसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ज्यावेळी मुख्यमंत्री होते, म्हणजे 2012 साली त्यांनी नोएडाला भेट दिली होती. त्यानंतर अनेकदा त्यांनी नोएडाला भेट दिली. नंतर पुढच्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला व्हावं लागलं. 

योगी आदित्यनाथ यांनी मिथक योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेकदा नोएडाला भेट दिली होती. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद जाणार, त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. पण योगी आदित्यनाथ यांनी हे सर्व समज  मोडून काढले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्ता स्थापन करणार आहे. 

योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीउत्तर प्रदेशची सर्वात मोठी लढाई  भाजपनं जिंकलेली असून जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. या निवडणूक निकालानंतर योगी आदित्यनाथ यूपीमध्ये आणखी एक इतिहास रचणार आहे.  यूपीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकच व्यक्ती सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांना कोणताही व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होत नाही असा इतिहास आहे. पण योगी आदित्यनाथ आता त्यामध्ये यशस्वी झाले आहेत. 

संबंधित बातम्या: