Uddhav Thackeray , Sangola : "दीपक साळुंखेंना विधीमंडळात पाठवा, सांगल्यातील मागण्याचे निवेदन घेतो. सर्वकाही मंजूर करतो. तुमच्यावर दीपक आंबांना पाठवायचं की नाही. रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट पाहिजे. 23 तारखेंचं एक तिकीट पाहिजे. ते सुद्धा गुवाहाटीचं. त्यांना परत जाऊद्या. काय झाडी, काय डोंगर त्यांना तिकडेच झाडं मोजत बसूद्या", असं ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते सांगोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 


किती माज असायला पाहिजे, लय म्हणजे काय एकदमचं लय


उद्धव ठाकरे म्हणालो, देव संधी देत असतो. संधीचं सोनं करायचं की माती करायची हे ज्याचं त्यांने ठरवायचं. गेल्यावेळी एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली. तुम्ही सर्वांनी त्यांना संधी दिली. मात्र, त्यांनी संधीचं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं. किती माज असायला पाहिजे, लय म्हणजे काय एकदमचं लय...पण त्यांना हे माहिती नव्हतं, ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं, ते त्यांचा माज देखील उतरवू शकतात. मी त्यांचा माज उतरवायला आलेलो आहे. गद्दारांना गाडायला आलेलो आहे. गद्दारांना वाटलं ते गद्दार म्हणजे सगळी लोकं गद्दार? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. 


गेल्यावेळीच दीपकआबांना उमेदवारी देणार होतो, पण मध्येच धरण फोडणारा खेकडा घुसला


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास आहे, तो कधी गद्दारांना माफ करत नाही. गद्दारांना सांगायचं आहे, तिथला डोंगर तू पाहिलास, पण इथल्या रायगडाचे टकमक टोक नाही पाहिले. ते तुला 23 तारखेला दिसणार आहे. त्या टकमक टोकावरुन सर्व जनता तुझा राजकीय कडेलोट करेल. तुला काय नव्हतं दिलं? प्रामाणिकपणाने सांगतो. गेल्यावेळीच दीपकआबांना उमेदवारी देणार होतो, पण मध्येच धरण फोडणारा खेकडा घुसला. त्याने सांगितलं. माझं ऐका हा 100 टक्के निवडून येतो. मग मी त्याला उमेदवारी दिली. पण दीपकआबांना सांगितल्यानंतर त्यांनी लबाडी केली नाही. बंडखोरी केली नाही. असा सैनिक पाहिजे, तुमच्यासाठी लढणारा. 


मुलींसोबत प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण देणार आहे, कोणीही मागणी न करता मी 2लाखापर्यंत कर्जमुक्ती करून दाखवली. तुम्हाला शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र मोदी शहांचा नाही. प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार आहे.  सुरतेला देखील बांधणार आहे. तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो. मुख्यमंत्री असताना एकतर उद्योग गुजरातला नेऊ दिला नाही. म्हणून सरकर पाडले. 370 कलम काढले मग शेतमालाला भाव का नाही? अमित शाह ब्राम्ही तेल लावा. काश्मीर पंडितांना हल्ले होत होते तेव्हा मोदी शहा कोणाला माहित नव्हते, तेव्हा त्यांना बाळासाहेबांनी आसरा दिला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मी संधीसाधू तर शरद पवार कोण?; अशोक चव्हाणांचा प्रतिसवाल, जरांगेंच्या भूमिकेवरही परखड मत