मुंबई : महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, आज शिवसेना ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला फुल्ल टशन दिल्याचं दिसून येत आहे. कारण, ठाकरेंनी 65 पैकी 33 उमेदवार हे शिंदेंच्या शिवसेना उमेदवारांच्या विरुद्ध मैदानात उतरवले आहेत. त्यामध्ये, शिंदेंचे गुवाहटीचे 7 शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी दंडो थोपटल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री तानाजी सावंत, मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट यांच्यासह इतरही बड्या नेत्यांविरुद्ध ठाकरेंनी उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री शिंदेंना फुल्ल टशन दिल्याचं दिसून येत आहे. 


राज्यातील राजकीय वातावरण आता तापायला लागले असून शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे अद्यापही उमेदवारी मिळावी म्हणून नेत्यांनी मुंबईत नेत्यांच्या बंगल्यावर रांगा लावल्या आहेत. तर, दुसरीकडे उमेदवार यादीत नाव जाहीर झाल्याचे समजताच, एबी फॉर्म घेऊन उमेदवारांकडून जल्लोष केला जात आहे. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेविरोधात पहिल्या यादीतील 33 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या लढती आहेत. त्यात, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध दिवंगत आनंद दिघेंच्या पुतण्याला म्हणजेच केदार शिंदेंना तिकीट देण्यात आलंय.  


शिंदे विरुद्ध ठाकरे  7 बड्या लढती


1) कोपरीपाचपखाडी
मुख्यमंत्री विरुद्ध केदार दिघे .


2) परांडा
सावंत विरुद्ध राहुल पाटील.


3)रत्नागिरी
उदय सामंत विरुद्ध सुरेंद्र नाथ माने


4)संभाजीनगर पश्चिम
 संजय शिरसाठ विरुद्ध राजू शिंदे


5)सावंतवाडी
दिपक केसरकर विरुद्ध राजन तेली.


6) सांगोला 
शहाजी बापू पाटील विरुद्ध साळुंखे


7) कळमनुरी 
संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे


महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होत असताना, शिवसेना विरुद्ध शिवसेना व राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना होत आहे. त्यातच, शिंदेंनी 45 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज ठाकरेंनी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये, मुंबईत 13 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. तर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवलंय. तसेच, झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेंच्या पहिल्या यादीतील सर्वच 45 उमेदवारांविरुद्ध ठाकरेंनी उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये, प्रताप सरानाईक विरुद्ध नरेश मणेरा, सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत, किरण सामंत यांच्याविरुद्ध राजन साळवी, तानाजी सावंत यांच्याविरुद्ध रणजीत पाटील, संजय शिरसाट यांच्याविरुद्ध राजू शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे. 


हेही वाचा


बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी