पालघर : पालघर लोकसभेच्या प्रचाराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईतील नायगाव भागातून सुरुवात केली. युतीचा धर्म पाळा आणि महायुतीचा धर्म पाळून रेकॉर्डब्रेक मतदान करा, वसई-विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी भाषणात केलं.
वसईतील नायगाव नाक्यावरुन शिवसेनेने रोड शो सुरु केला. अनेक सामाजिक आणि धार्मिक स्थळांनाही उद्धव ठाकरेंनी भेटी दिल्या. गुरुद्वारेला भेट देऊन वसईतल्या शिख समुदायाशी त्यांनी संवाद साधला आणि युतीला मतदान करण्याचं आवाहन केलं.
वसईचे बिशप डॉक्टर फेलिक्स मच्याडो यांची उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड भेट घेतली. तर बसीन कॅथलिक बँकेचं संचालक मंडळ, वकील संघटनांचीही त्यांनी भेट घेतली. वसईतल्या न्यायालयाची दुरवस्था झाल्याची तक्रार वकिलांनी उद्धव ठाकरेंकडे केली.
त्यानंतर वसईतल्या पारनाक्यावर उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. शिवसेना-भाजप वाद संपलेला आहे. वाद एक दुर्घटना होता. युतीचा धर्म पाळा असं आवाहन उद्धव यांनी केलं. चिमाजी आप्पा स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पुढे पत्रकार परिषद घेत उद्धव यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही टीका केली.
महायुतीचा धर्म पाळा, गुंडगिरी हद्दपार करा, पालघर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2019 07:40 PM (IST)
वसईचे बिशप डॉक्टर फेलिक्स मच्याडो यांची उद्धव ठाकरेंनी बंद दाराआड भेट घेतली. तर बसीन कॅथलिक बँकेचं संचालक मंडळ, वकील संघटनांचीही त्यांनी भेट घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -