World AIDS Day : आजचा दिवस जगभरात 'जागतिक एड्स दिन' (World AIDS Day) म्हणून पाळला जातोय. एड्स हा एक गंभीर आजार आहे जो जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करतो. या आजाराबाबत फारशी जागरूकता नसल्यामुळे हा आजार अधिक धोकादायक ठरतो. अशा वेळी, लोकांमध्ये या आजाराविषयी अधिक जागरूक व्हावी या उद्देशाने दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. हा एक असा आजार आहे ज्यावर वेळेवर उपचार करून बऱ्याच अंशी या आजारावर नियंत्रण मिळवता येते.
तसेच, आजही या आजाराबाबत लोकांच्या मनात अशा अनेक समज-गैरसमज आहेत. ज्यामुळे हा आजार अधिक गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आज जागतिक एड्स दिनानिमित्त आम्ही तुम्हाला एड्सशी संबंधित अशाच काही मिथकांबद्दल सांगणार आहोत. ज्या प्रत्येक व्यक्तीने समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.
एचआयव्ही आणि एड्स म्हणजे काय?
HIV हा एक विषाणू आहे, ज्यामुळे ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच एड्स होतो. हा विषाणू आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे शरीराला संक्रमण आणि कर्करोगासह अनेक रोगांपासून बचाव करणे कठीण होते. एड्सशी संबंधित काही सामान्य समज आणि गैरसमज आहेत ते समजून घेऊयात.
गैरसमज 1 : एचआयव्ही केवळ काही लैंगिक अभिमुखतेवर परिणाम करतो.
तथ्य : हे पूर्णपणे चुकीचे आहे. जागतिक आरोग्य संस्था (WHO) नुसार, कोणतीही व्यक्ती, लिंग किंवा लैंगिक प्रवृत्तीची पर्वा न करता, HIV ची लागण होऊ शकते.
गैरसमज 2 : तुम्हाला एचआयव्ही असल्यास, तुम्ही व्यायाम करणे टाळावे.
तथ्य : हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर व्यायाम हा एक चांगला मार्ग आहे. व्यायामाच्या मदतीने तुम्ही थकवा सहज टाळू शकता. व्यायामाने जास्त भूक लागते. तणाव कमी होतो. तसेच तुमच्या स्नायू आणि हाडांचे संरक्षण होते.
गैरसमज 3 : दोन्ही व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यास, कंडोमची आवश्यकता नाही.
तथ्य : हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. जे लोक एचआयव्हीबाधित आहेत त्यांना इतर एसटीआय (लैंगिक संक्रमित रोग) होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत.
गैरसमज 4 : HIV वर उपचार करण्यासाठी, तुम्हाला दररोज भरपूर गोळ्या घ्याव्या लागतील.
तथ्य : फार पूर्वी, HIV ग्रस्त लोकांना खूप गोळ्या घ्याव्या लागत होत्या, पण आता HIV वर उपचार घेणारे बहुतेक लोक रोज फक्त 1 ते 2 गोळ्या घेतात.
गैरसमज 5 : एखादी व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आहे की नाही हे त्यांना पाहूनच सांगता येते.
तथ्य : तुम्ही HIV पॉझिटिव्ह लोकांना त्यांच्या लक्षणांनुसार ओळखू शकत नाही. HIV बाधित लोकांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :