गेली 25 वर्ष शिवसेना-भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युतीमध्ये होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकीत काही मुद्द्यांमुळे आम्ही स्वतंत्र लढलो. गेल्या पाच वर्षातील उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची कोणतीही भाषणं काढून बघा, जे मुद्दे आम्हाला पटले नाहीत, किंवा जे जनहिताच्या विरोधात होते, ते मुद्दे मांडून आम्ही लढलो. आमचं वैयक्तिक भांडण नव्हतं. जेव्हा समाधान झालं, तेव्हा युतीच्या दिशेने पावलं टाकली, राम मंदिर, पीक विमा, शेतकरी कर्ज, नाणार हे पाच मुद्दे मान्य झाले, असं अनिल परब यांनी सांगितलं.
शिवसेना-भाजप युतीचा पक्षाला फायदाच झाला. कारण लोकसभेत शिवसेनेला एक जागा वाढवून मिळाली. विधानसभेत 50-50 फॉर्म्युला आहे. यंदा 144 जागांची मागणी आहे, मात्र मित्रपक्षांबाबत अद्याप ठरायचं आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं.
भाजप आपले मुद्दे ऐकत नसल्यामुळे भांडण होतं, मात्र वैयक्तिक वैर नाही. भाजप नेतृत्वावर टीका कधीच केली नाही. युती केली तेव्हाच मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढण्याचं मान्य केलं होतं, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
संदर्भासह स्पष्टीकरण
1. अफझलखान - इतिहासात एखादा शत्रू चाल करुन येतो, तेव्हा त्याला अफझलखान असं म्हणतात.
2. स्वबळाचा नारा - प्रत्येक पक्षाचा स्वबळाचा नारा असतो. देशात युती ही अपरिहार्यता आहे
3. अडीच अडीच वर्ष - सत्तेचं समान वाटप. विधानसभेला अद्याप वेळ आहे. युतीच्या चर्चेला असलेले नेते सविस्तर खुलासा करतील.
अनिल परब यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7
एका वाक्यात उत्तरे द्या
1. अमित शाहांची मातोश्रीवारी कोणामुळे झाली? - राजकीय गणितांमुळे
2. या युतीचे शिल्पकार कोण?- जनतेची इच्छा
3. उद्धव ठाकरेंचा चांगला गुण कोणता? - संयम
अनिल परब यांना मिळालेले गुण : 10 पैकी 6
कोण कोणास आणि का म्हणाले?
युती-बिती गेली खड्ड्यात - उद्धव ठाकरे म्हणाले. आधी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा, मार्ग शोधा. कारण जनहित महत्त्वाचं आहे. युतीपेक्षा इतर प्रश्नांना प्राधान्य असल्याचं दिसतं.
बाप बाप होता है- शिवसेना हा मोठा भाऊ कायमच राहिलाआहे. दुर्दैवाने लोकशाहीत नंबरवर बाप ठरतो.
सोबत आले तर ठीक आहे, नही तो पटक देंगे- अमित शाह म्हणाले. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी म्हणावंच लागतं. आता एकत्र आल्यामुळे विरोधकांना हा इशारा आहे. भाऊ पण म्हणतो 'बघून घेईन', याचा अर्थ ती धमकी होत नाही.
पहले मंदिर फिर सरकार- राम मंदिराचा पूर्ण प्लान समजलाच पाहिजे, अशी मागणी होती. तो कळला त्यामुळे सरकारची बोलणी झाली.
अनिल परब यांना मिळालेले गुण : 10 पैकी 8
कल्पनाविस्तार
25 वर्ष युतीत सडलो - भाजपला दिलेल्या मतदारसंघात स्वतःच्या पक्षाची बांधणी झाली.
जर बाळासाहेब असते तर....- बाळासाहेबांना अभिमान वाटेल अशीच युती झाली.
अनिल परब यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7
सविस्तर उत्तरं द्या
रामदास कदम यांना कोणतीही वक्तव्य करण्याचा सल्ला देता का? - ते शिवसेनेचे नेते आहेत, मी सामान्य कार्यकर्ता. त्यांना नेता म्हणून स्वतःची मतं आहेत. वेळेचा संदर्भ असू शकतो.
अनिल परब यांना मिळालेले गुण : 10 पैकी 8
बहुपर्यायी प्रश्न
युतीचा व्हिलन कोण?
1. किरीट सोमय्या 2. आशिष शेलार 3. संजय राऊत
उत्तर- परिस्थिती
उद्धव ठाकरे कोणाचं ऐकतात?
1. संजय राऊत 2. मिलिंद नार्वेकर 3. रश्मी ठाकरे
उत्तर- सर्वांच्या हिताचं ऐकतात
शिवसेनेची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण?
1. एकनाथ शिंदे 2. सुभाष देसाई 3. उद्धव ठाकरे-
उत्तर - हा प्रश्न मातोश्रीचा आहे. खूप अगोदर
अनिल परब यांना मिळालेले गुण : 10 पैकी 8
अनिल परब यांना मिळालेले एकूण गुण : 60 पैकी 44
पाहा संपूर्ण भाग :