यवतमाळ : शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. यवतमाळच्या वैभवनगर परिसरात ही घटना घडली. 'काश्मीरला परत जात', असं म्हणत युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी 3 ते 4 काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली.

या कार्यकर्त्यांनी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने लोहारा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे.

पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच आता यवतमाळमधील घटनेचा समावेश झाला आहे.