Thane Vidhan Sabha Result 2024: महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती यायला सुरूवात झालीय. हळूहळू सर्व चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीसमोर या निवडणुकीत सत्ता राखण्याचे आव्हान असून महाविकास आघाडीनेसुद्धा सत्ताधाऱ्यांना मोठी टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं. ठाणे जिल्ह्यात एकूण 56.05 टक्के मतदान झालं. ठाणे विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर एबीपी माझाने ठाण्यातील जनतेचा कौल घेतला, त्यावेळी ठाणे मतदारसंघात अनेकांनी मनसेचे अविनाश जाधव यंदा बाजी मारतील अशी उत्तर दिली. मात्र निकालाची तिसरी फेरी जाहीर होताच मनसेला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपच्या संजय केळकर आघाडीवर आहेत. तर मनसेचे जाधव थेट तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


ठाणे विधानसभा (तिसरी फेरी)


संजय केळकर - भाजप - 4632
राजन विचारे - उद्धव सेना - 1625
अविनाश जाधव - मनसे - 1245
नोटा - 
आघाडी -  केळकर - 8983


ठाणे विधानसभा (पहिली फेरी)


ठाणे विधानसभा निकालाच्या पहिल्या फेरीत भाजपचे संजय केळकर आघाडीवर असून त्यांना 4336 मते मिळाली. तर उबाठा सेनेचे राजन विचारे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. तर थेट तिसऱ्या क्रमांकांवर मनसेचे अविनाश जाधव असून त्यांना 2243 मते ही पहिल्या फेरीत मिळाली. संजय केळकर हे 2093 मतांनी पुढे असल्याचं दिसत होतं. तर आता तिसरी फेरीही समोर आलीय. ज्यामधून हळूहळू चित्र आता स्पष्ट होत आहे.


ठाणे विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत


विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर एबीपी माझाने ठाण्यातील जनतेचा कौल घेतला. यावेळी ठाणे विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला होता. ठाणे मतदारसंघात मनसेकडून अविनाश जाधव, भाजपकडून विद्यामान आमदार संजय केळकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात होते. या ठाणे मतदारसंघात अनेकांनी अविनाश जाधव यंदा बाजी मारतील अशी उत्तर दिली. तर पुन्हा संजय केळकर विजयी होतील, असा अंदाज देखील ठाणेकरांनी व्यक्त केला होता. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. आता याच बालेकिल्ल्यात आणि ठाणे मतदारसंघात मनसेचे अविनाश जाधव निवडून आल्यास एकनाथ शिंदेंना मनसे महागात पडेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय. तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात विद्यामान मुख्यमंत्री पुन्हा जिंकून येतील, असा विश्वास ठाणेकरांनी व्यक्त केला आहे होता. 


मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?


महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections/amp  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.