Eknath Shinde Shiv Sena MLA Result 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या काही वर्षांआधी 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाली होती. 40 समर्थक आमदार घेऊन शिंदे गुजरातमधील सूरतला गेले होते. तेथून ते आज गुवाहाटीला एका हॉटेलमध्ये गेले. आणि हेच शिवसेना पक्षातील आजवरचे सर्वात मोठे बंड ठरले.
त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ पाहिला मिळाली. कारण राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. नंतर धनुष्यबाण हे चिन्ह ही निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले. परंतु या सगळ्या घडामोडीनंतर असे म्हटले जात होते की जे शिवसेना सोडून गेले त्यांचा निवडणुकीत पराभव होईल. परंतु निकालाने हे सगळे दावे फोल ठरवले. एकनाथ शिंदे यांनी या विधानसभा निवडणुकीत सगळ्याच ठिकाणी दणदणीत असा विजय मिळवला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटील गेलेल्या आमदारांचा निकाल
एकनाथ शिंदे - विजयी
अनिल बाबर - मुलगा सुहास बाबर यांना उमेदवारी दिली (विजयी)
शंभूराजे देसाई - विजयी
सदा सरवणकर - पराभूत
दीपक केसरकर - विजयी
शहाजी पाटील - पराभूत
उदय सामंत - विजयी
महेश शिंदे - विजयी
महेंद्र थोरवे - विजयी
भरतशेठ गोगावले - विजयी
महेंद्र दळवी - विजयी
प्रकाश अबिटकर - विजयी
डॉ. बालाजी किणीकर - विजयी
ज्ञानराज चौगुले - पराभूत
प्रा. रमेश बोरनारे - विजयी
तानाजी सावंत - विजय
विलास संदीपान भुमरे - विजय
अब्दुल सत्तार नबी - विजयी
प्रकाश सुर्वे - विजयी
बालाजी कल्याणकर - विजयी
संजय शिरसाठ - विजयी
प्रदीप जयस्वाल - विजयी
संजय रायमुलकर - पराभूत
संजय गायकवाड - विजयी