Varun Sardesai On Amit Thackeray मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) आज वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरत आहेत. वरुण सरदेसाई यांच्याविरोधात नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले विद्यामान आमदार झिशान सिद्दिकी यांचं आव्हान असणार आहे. अर्ज भरायला जात असताना वरूण सरदेसाई यांनी विजयाचा आत्मविश्वास  व्यक्त केला आहे. तसेच मी जर आमदार झालो, तर माझं मत हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी असेल, असं वरुण सरदेसाई यांनी सांगितले. तसेच झिशान सिद्दीकी हे निवडून आल्यास मुख्यमंत्रि‍पदासाठी त्यांचं मत कोणाला असेल, हे त्यांनी जाहीर करावं, असं आव्हान देखील वरुण सरदेसाई यांनी दिलं आहे.  


वरुण सरदेसाई यांनी अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा-


वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या उमेदवारीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमित ठाकरेंसोबत नक्कीच शुभेच्छा आहेत आणि शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. जे उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे, त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तसेच हे काही युद्ध नाहीय. विचार वेगळे असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या पक्षात लढत आहोत. तुम्ही मला जर विचाराल की माहीममध्ये कोणाचा प्रचार कराल, तर 100 टक्के महेश सावंत यांचा प्रचार करेल, असं विधान वरुण सरदेसाई यांनी केलं. 


मी जिंकणार, मला आत्मविश्वास- वरुण सरदेसाई


वांद्रे पूर्वमध्ये मी निवडणूक लढतोय, तशी धाकधूक नाहीय. मी जिंकणार याबाबत मला आत्मविश्वास आहे, असं वरुण सरदेसाई म्हणाले. पडद्याच्यासमोर जरी मी आता येत असलो, तरी पडद्याच्या मागे मी 15 वर्ष संघटनेत काम करत आहे. स्वतः उमेदवार म्हणून पहिल्यांदाच रिंगणात उतरलो आहे. मला विश्वास आहे की, प्रचाराला आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा प्रतिसाद लोक देतील आणि आमचा विजय होईल. वांद्रे पूर्वची जनता चांगल्या सुशिक्षित उमेदवाराची वाट बघत होती, असंही वरुण सरदेसाई यांनी सांगितले. 


माहीम विधानसभेकडे सर्वांचं लक्ष-


महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यादरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माहीमविधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माहीममध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातमी:


Amit Thackeray: '...तर आम्हीही आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नसता'; अमित ठाकरेंनी थेट जाहीर करुन टाकलं!


वरुण सरदेसाई नेमकं काय म्हणाले, पाहा संपूर्ण Video: