Amit Thackeray On Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदा माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे आज उमेदवारी भरणार आहेत. अमित ठाकरे सकाळी नऊ वाजता मीनाताई ठाकरे पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला अभिवादन करतील, अशी माहिती समोर आली आहे.


अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराला जोरदार सुरुवात देखील केली आहे. याचदरम्यान त्यांच्या एका विधानाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. अमित ठाकरेंनी साम या वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.  मी आजारी होतो तेव्हा मला माहित होतं की, माझे वडील काय आहेत या फोडाफोडीचा त्यांना काही फरक पडणार नव्हता आणि ते पुढे काय करू शकतात हेही मला माहीत होतं. पण त्यावेळी नैतिकता पाळली गेली नाही, असं अमित ठाकरे म्हणाले. 


माझ्यासाठी विषय संपला- अमित ठाकरे


आता ते बोलतात की, मी आजारी असताना माझे 40 आमदार फोडले, तेव्हा मी आजारी असताना तुम्ही सहा नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला तुमची चूक दिसली नाही का?, असं अमित ठाकरे म्हणाले. तसेच दोन भाऊ एकत्र यावे हे जे मला अगोदर वाटत होतं ते या प्रकारानंतर पूर्णपणे माझ्या डोक्यातून निघून गेलं, आता मला तसं अजिबात वाटत नाही. तो विषय माझ्यासाठी तरी संपलेला आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 


मी राज ठाकरेंकडून हे शिकण्याचा प्रयत्न करतोय- अमित ठाकरे


बाळासाहेबांबरोबर राज ठाकरे दोन-तीन वर्षाचे असल्यापासून फिरत होते. त्यांनी अनेकदा सांगितलं पण होतं की शाळेत प्रिन्सिपल ने बोलावल्यावर त्यांचे वडील जाण्याऐवजी बाळासाहेब जायचे एवढे त्यांचे नातेसंबंध दृढ होते. कोणत्याही आमदाराचे खासदाराचे किंवा नगरसेवकाचे जर अचानक दुःखद निधन झाले तरी आपण तिथे कधीच उमेदवार देत नव्हतो कारण बाळासाहेब यांची ही शिकवण होती की ती त्यांची जागा ही त्यांच्या घरातल्याच कोणालातरी मिळायला हवी, हे संस्कार राज ठाकरेंवर आहेत आणि मी त्यांच्याकडून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय, असं अमित ठाकरे म्हणाले.


संबंधित बातमी:


Amit Thackeray: '...तर आम्हीही आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नसता'; अमित ठाकरेंनी थेट जाहीर करुन टाकलं!