पाटणा : बिहार निवडणुकीमध्ये एनडीएने दोनशेच्या वर जागा जिंकल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड (JDU) पक्षाला जवळपास 84 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता प्रशात किशोर राजकारण सोडणार का असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे प्रशांत किशोर (Prashant Kishor)यांचे निवडणुकीपूर्वीचे एक वक्तव्य.
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड (JDU) चांगली कामगिरी करत 83 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयूच्या या मोठ्या यशानंतर जन सुराज चे संस्थापक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा एक जुना विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
'जर नितीश कुमार यांच्या पक्षाला 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडून देईन' असं वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केलं होतं. जुलै 2025 मध्ये प्रशांत किशोर यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Prashant Kishor Jan Suraaj Party : जन सुराजचा निराशाजनक परफॉर्मन्स
प्रशांत किशोर यांच्या जन सुराजने या निवडणुकीत 243 पैकी 238 सीटांवर उमेदवार दिले होते. मात्र त्यांच्या पक्षाला खातंही खोलता आलं नाही. प्रशांत किशोर यांचे 116 उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर 122 उमेदवार तिसऱ्याखालील क्रमांकावर राहिले.
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला 15 लाख इतकी मतं पडली असून त्याचे प्रमाण हे 3 टक्के इतकं आहे. त्यांच्या पक्षाच्या 32 उमेदवारांनी 10 हजाराहून जास्त मतं घेतली आहेत. ज्या प्रमाणात जन सुराजने राज्यभर प्रचार केला, त्यापेक्षा खूपच कमी मत मिळाल्याने पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Jan Suraaj Party Performance : काही जागांवर जन सुराजचे ‘कटिंग’ मत निर्णायक
जन सुराजचा थेट विजय कुठेही झाला नसला तरी काही मतदारसंघांमध्ये त्यांच्या मतांचा थेट परिणाम प्रमुख पक्षांवर झाला. त्याचा जास्त परिणाम हा राष्ट्रीय जनत दलवर झाला. तर जेडीएस आणि भाजपचेही काही उमेदवार मागे पडले.
जेडीयूच्या मोठ्या यशामुळे प्रशांत किशोरांचा ' नितीश कुमार यांना 25 जागांपेक्षा जास्त मिळाल्या तर राजकारण सोडेन' हा दावा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, जन सुराजची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच निराशाजनक राहिल्याने पक्षाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही बातमी वाचा: