Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून प्रथमच नशीब आजमावत असलेल्या रोहित आर. आर. पाटील यांनी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदारांना भावनिक साद घातली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं, असे भावनिक आवाहन केलं आहे.
रोहित पाटील यांनी काय म्हटलं आहे?
मी रोहित सुमन आर आर आबा पाटील महाविकास आघाडीचा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार आव्हान करतो की निवडणूक अंतिम टप्प्यात आलीये मतदानाला काही तास उरलेत. आजपर्यंत इथल्या जनतेने स्वर्गीय आर आर आबांना हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याच कामं केलं, आणि आबांनी ही जनतेच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता संपूर्ण ताकदीने शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं..! स्वर्गीय आबांच्या विचाराची पताका पुढे घेऊन जाण्यासाठी आबांचे विचार अधिक घट्ट रुजवण्यासाठी आणि यातून मतदारसंघामध्ये समृद्धी आणण्यासाठी गेल्या ९ वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझे कुटुंबीय करत आहोत..!आज तासगांव कवठेमहांकाळ मतदारसंघातली ही लढाई फक्त २ उमेदवारांपुरती सीमीत नाही, तर २ प्रवृत्तीमध्ये आहे.
लोकशाहीची हत्या करणारी विरोधातली प्रवृत्ती आपल्यासमोर
निष्ठा, संवेदना, भावना यांना बगल देऊन, मतदारसंघातील विकासाचा अडथळा बनून, इथल्या तरुणांचं कष्टकरी शेतकऱ्याचं भविष्य हे हुकूमशाही, दडपशाही, गुंडगिरी अवैध धंद्याना चालना देऊन अंधारात टाकून,जनतेची लूट करून त्यांचा आवाज दाबून लोकशाहीची हत्या करणारी विरोधातली प्रवृत्ती आपल्यासमोर आहे. तर दुसरीकडे मी तुमच्यासमोर ठेवलेली विकासाची दूरदृष्टी, युवकांच्या रोजगारासाठीचे असलेले नियोजन, मतदारसंघाच्या विकासासाठीचा असलेला आराखडा, शेतकरी कष्टकरी जनतेचा उद्धार करण्यासाठीची भूमिका,पक्ष आणि पक्षाची पुरोगामी विचारधारेप्रती ठेवलेली निष्ठा आणि त्यातून साधला जाणारा भविष्याचा मतदारसंघतला शाश्वत विकास..!
हा श्वास कधी गुदमरून देणार नाही
आता तासगाव कवठेमहांकाळ मधल्या सुज्ञ जनतेनी ठरवायचं आहे की आपल्या मतदारसंघाच भविष्य हे कोणत्या प्रवृत्ती मध्ये सुरक्षित आहे. आणि मला विश्वास आहे की इथली जनता कायमच सगळा दबाव झूगारुन सत्याच्या, लोकांसाठी कामं करणाऱ्याच्या पाठीमागे ढाल बनून उभी राहते..! आज मी आपल्याला वचन देतो कीं ही जनता म्हणजे आबांचा श्वास आहे आणि हा श्वास कधी गुदमरून देणार नाही. तासगाव कवठेमहांकाळ च्या जनतेला मी आव्हान करतो की महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही तुमचे आशीर्वाद माझा पारड्यात टाकावे मला तुमच्या पदरात घ्यावं..! 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपण अनुक्रमांक 1 रोहित सुमन आर आर आबा पाटील या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मोहोरं लावून आपलं अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी कराव..!!
इतर महत्वाच्या बातम्या