Amitabh Bachchan Angry On Aishwarya Rai: बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोघेही आता एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू असून दोघेही वेगवेगळे राहत असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकत्र कुठेच दिसलेले नाहीत. याशिवाय अद्याप दोघांनीही वेगळं होण्याबाबात किंवा इतर काही गोष्टींबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, या सर्व चर्चांदरम्यान, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि ऐश्वर्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी (Bigg B) ऐश्वर्याला ओरडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अमिताभ आणि ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल
जेव्हापासून अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, तेव्हापासूनच दोघांचे जुने आणि नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक थ्रोबॅक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या दोघे एका इव्हेंटला गेलेले. त्यावेळी अनेक माध्यमांचे कॅमेरे दोघांवर खिळले होते. अशातच ऐश्वर्यानं अमिताभ यांच्याशी अगदीच प्रेमानं, लाडात वागू लागली. पण, ऐश्वर्याचं ते वागणं अमिताभ बच्चन यांना काही पटलं नाही. अमिताभ यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तात्काळ बदलले आणि ते संतापले.
ऐश्वर्यावर चिडले अमिताभ बच्चन
ऐश्वर्या म्हणाली की, तुम्ही बेस्ट आहात... यानंतर ऐश्वर्या अमिताभ बच्चन यांना मिठी मारते. पण, सर्वांसमोर ऐश्वर्यानं असं लाडात वागणं अमिताभ बच्चन यांना फारसं आवडत नाही. ते तिच्यावर चिडतात. अमिताभ सर्वांसमोरच ऐश्वर्याला म्हणतात की, आराध्यासारखं वागणं बंद कर... अमिताभ चिडल्यानंतरही ऐश्वर्या स्वतःला सावरते. ती तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी होऊ देत नाही. ऐश्वर्या म्हणते की, हे तर सर्वांनाच माहीत आहे... त्यानंतर एक रिपोर्टर ऐश्वर्याला विचारतो की, आराध्या अजून लहान आहे, पण तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत? यावर ऐश्वर्या शांत असते. मात्र, उत्तर अमिताभ बच्चन देतात. ते म्हणतात की, 5 कलाकार नाहीत, तर 6 आहेत, आराध्या हळूहळू कला आत्मसात करत आहे.
अमिताभ-ऐश्वर्याच्या व्हिडीओवर नेटकरी काय म्हणाले?
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. एका युजरन कमेंटमध्ये लिहिलंय की, ऐश्वर्या रायनं मद्यपान केलंय, असं वाटतंय... तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, अमिताभ ऐश्वर्यासोबत कसे वागतात, हे दिसतंय. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.