कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत 1 कोटी 52 लाख 60 हजार 263 रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदार संघातून निवडणूकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या विवरण पत्रात ही माहिती दिली आहे.
त्यांची 2014 ला एकूण मालमत्ता 83 लाख 87 हजार 70 रुपये होती. ती आता 2019 ला 2 कोटी 36 लाख 47 हजार 333 रुपये इतकी झाली आहे. टक्केवारीचा विचार करता त्यांच्या मालमत्तेत तिप्पट वाढ झाली आहे.
आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून काँग्रेस- राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी शेतकरी आणि आघाडी आपल्यासोबत असल्यामुळे माझा विजय नक्की असल्याचा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. तर दुसर्या बाजूला सांगली जिल्ह्याच्या जागेचा तिढा सुटला असून ती जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे. उमेदवार ठरवण्याच्या बाबतीत लवकरच निर्णय करु आणि वेळ पडल्यास काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराला आम्ही उमेदवारी द्यायला आम्ही तयार आहोत, असेही शेट्टी म्हणाले.
या रॅलीत राजू शेट्टी यांच्यासोबत किसान संघटनेचे नेते योगेंद्र यादव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून आपला अर्ज भरला.
स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींची संपत्ती पाच वर्षात तिपटीने वाढली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2019 04:33 PM (IST)
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून काँग्रेस- राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -