अहमदनगर : राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष नाही, पक्ष चिन्हही त्यांचं नाही. जर पक्षाच्या चिन्हाखाली न्यायप्रविष्ट असं नोटिफिकेशन येत नसेल तर मला सांगा मी त्यांना कोर्टामार्फत नोटीस पाठवते असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आमची लढाई कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही तर भाजप या पक्षाविरुद्ध आहे असही त्या म्हणाल्या. अहमदनगरमध्ये त्या बोलत होत्या

Continues below advertisement

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्षावर अजित पवारांचा दावा नसल्याचे सांगितलं. भाजपचे चुकलेले धोरण, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

शिवीगाळ करणारी भाजप हा ओरिजनल भाजप नाही

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारसभेत राम शिंदे यांच्यासह भाजप नेते पाशा पटेल यांनी रोहित पवारांना शिवीगाळ करत अश्लील हावभाव केल्याचा प्रकार घडला. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. हे अतिशय दुर्दैवी असून गलिच्छ असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.  या सुसंस्कृत महाराष्ट्रात काय भाषण केले जात आहे याचं मला आश्चर्य वाटतंय. भाजप हा ओरिजनल सुसंस्कृत पक्ष होता. आता ही दुसरी बीजेपी झाली असून आज जे शब्द वापरले गेले, त्याचा मी निषेध करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Continues below advertisement

भाजपनेच अजित पवारांना बदनाम केलं

अजित पवारांनी तीस वर्ष राजकारण केलं. मात्र सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार यांनी अजित पवारांना बदनाम केलं असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "शरद पवारांनी अजित पवारांना चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनवले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी फक्त बदनामी केली. अजित पवार यांची यांची सर्वात मोठी बदनामी जर कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पार्टीने  केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले, अजित पवारांची चौकशी व्हावी ही मागणी भाजपने केली. माझ्या तीन बहिणींच्या घरांवर छापे पडले. त्यांचा काहीही संबंध नसताना ही कारवाई करण्यात आली. अजित पवारांच्या साखर कारखान्यावर ईडीची नोटीस अदृश्य शक्तीने पाठवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही अजित पवारांवर कोणतेही आरोप केलेले नाही. अजित पवारांची बदनामी भाजपनेच केली."

सत्ताधाऱ्यांकडे कोणताच मुद्दा नाही

भाजप नेते आशिष शेलार यांनी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ ट्विट करत त्यांच्याकडून कशा पद्धतीने वोट जिहाद सुरू आहे याबाबत टीका केली. सोबतच मविआवर देखील निशाणा साधला. यावर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, आमच्या विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. मागच्या निवडणुकीतही भाजपने अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनाच स्वतः सोबत घेतलं.  

राज्यात  महाविकास आघाडीच सरकार येईल आणि महाराष्ट्रात परिवर्तन होईल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. भाजपवर निशाणा साधत मी भाजपसारखे आकडे सांगणार नाही पण सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना बदल हवा आहे. घर फोडा, पक्ष फोडा असं त्यांचं सुरू असून महागाईला आणि भ्रष्टाचाराला जनता कंटाळी असल्याचं सुळे यांनी म्हटलं.

ही बातमी वाचा: