काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये राज्यातील 48 जागांपैकी जवळपास सगळ्याच जागांवर सहमत झालं होतं. मात्र याला अहमदनगरच्या जागेचा अपवाद होता. आता याच जागेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत आहे. यानुसार काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून देण्यात आले आहेत.
मुलासाठी राधाकृष्ण विखे पाटलांचा आग्रह
अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु विखे पाटील आणि पवार कुटुंबातील वैर यामुळे या जागेवर निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडल्याची चर्चा सुरु होती. मात्र काँग्रेससाठी ही जागा सोडली नसल्याचं सांगत या जागेवर राष्ट्रवादीच लढणार असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप प्रवेशाची चर्चा, विखे पाटलांचं उत्तर
तसंच सुजय पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा होती. यावर सुजय भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, पण राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्णतः त्यांनाच आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे-पाटलांनी एकप्रकारे सुजय यांच्या पक्षांतराचे संकेत दिले होते.
संबंधित बातम्या
सुजय विखे-पाटील भाजपच्या मार्गावर? राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात...
सुजय विखे पाटील-रोहित पवार एकत्र, राजकीय वैर संपवून तिसऱ्या पिढीकडून मैत्रीचा नवा अध्याय?
अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध
राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव भाजपात प्रवेश करणार?
राधाकृष्ण विखे पाटील नाराज, महाआघाडीच्या दोन्ही मेळाव्याकडेही पाठ