लखनौ : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील रायबरेली या लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सोनिया यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सोनिया गांधी यांच्याकडे केवळ 60 हजार रुपयांची रोकड आहे तर 16.59 लाख रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवले आहेत.
सोनिया गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, त्यांनी रिलायन्स हायब्रिड बाँन्डसह 2 कोटी 44 लाख 96 हजार 405 रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच त्यांच्याकडे 28 हजार 533 रुपये किंमतीचे करमुक्त बॉन्ड आहेत. तसेच सोनिया यांनी पोस्टल सेविंग्स, विमा, राष्ट्रीय बचत योजनेत 72 लाख 25 हजार 414 रुपयांची गुंतवणूक केली आहे.
सोनिया यांच्याकडे नवी दिल्ली येथील डेरामंडी गावात शेतजमीन आहे. या जमिनीची किंमत 7 कोटी 29 लाख 61 हजार 793 रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे इटलीमध्ये 7 कोटी 52 लाख 81 हजार 903 रुपयांची वारसा हक्काने मिळालेली संपत्ती आहे. सोनिया यांनी मुलगा राहुल गांधी यांच्याकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सोनिया यांच्याकडे 59 लाख 97 हजार 211 रुपयांचे दागिनेदेखील आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोनिया यांनी रायबरेलीमध्ये एक रोड शो करुन शक्तीप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनिया म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2004 सालचा इतिहास विसरु नये. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेत येईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु सर्वांची भाकितं काँग्रेसने खोटी ठरवली होती. त्यामुळे 2004 हे वर्ष मोदींनी कधीही विसरु नये, असा इशारा दिला आहे.
सोनिया गांधींकडे केवळ 60 हजार रुपयांची रोकड, राहुल गांधींकडून 5 लाखांचं कर्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Apr 2019 09:13 PM (IST)
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील रायबरेली या लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सोनिया यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सोनिया गांधी यांच्याकडे केवळ 60 हजार रुपयांची रोकड आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -