सोलापूर : 2014 च्या मोदी लाटेत नवख्या शरद बनसोडेकडून पराभव झाल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला आहे. सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सामना भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याशी होता.
ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे निवडणुकीपूर्वी घोषित करणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंचा सपशेल पराभव झाला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे हेच सोलापूरमधून विजयाचे दावेदार असतील अशी चर्चा होती मात्र भाजपतर्फे धार्मिक कार्ड खेळत विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून लिंगायत धर्मगुरू असलेल्या डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.
त्यातच प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातूनही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकांच्या घोषणेपासूनच शिंदेच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. यंदाची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असे म्हणत भावनिक आवाहन केलं मात्र भावनिक आवाहनाला साथ न देता सोलापूरच्या जनतेने डॉ. जयसिद्धेश्वर यांनाच साथ दिल्याचं दिसून आलं आहे.
सुशीलकुमार शिंदेंना वंचितचा फटका?
यंदाच्या निवडणुकीत सोलापुरात वंचित फॅक्टरची भर पडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच सोलापूर मतदार संघातून उमेदवारी भरली. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार अशी शक्यता होती. ही शक्यता बऱ्यापैकी खरी ठरली आहे.
सोलापूर मतदारसंघाची आकडेवारी
- भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी - 526985
- कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे - 366377
- वंचित : प्रकाश आंबेडकर -170007
सोलापूर लोकसभा । सुशीलकुमार शिंदेंच्या राजकीय जीवनाचा शेवट अखेर पराभवानेच, भाजपच्या स्वामींचा करिष्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2019 11:30 PM (IST)
यंदाची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल असे म्हणत भावनिक आवाहन केलं मात्र भावनिक आवाहनाला साथ न देता सोलापूरच्या जनतेने डॉ. जयसिद्धेश्वर यांनाच साथ दिल्याचं दिसून आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -