मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीने जवळपास सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला आहे. औरंगाबादमधून इम्तियाज जलिल विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या सहा उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसल्याचं आतापर्यंत हाती आलेल्या निकालातून स्पष्ट झालं आहे.


नांदेडमध्ये अशोक चव्हाण (काँग्रेस), सांगलीमध्ये विशाल पाटील (स्वाभिमानी), बुलडाण्यात राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी (स्वाभिमानी), परभणीत राजेश विटेकर (राष्ट्रवादी), यवतमाळ माणिकराव ठाकरे (काँग्रस) या उमेदवारांना वंचित आघाडीच्या उमेदवारींना धक्का दिला आहे.


Loksabha Result | लोकसभेच्या निकालाबद्दल प्रकाश आंबेडकर आणि सुधीर मुनगंटीवार यांचं मत



वंचित बहुजन आघाडीचा फटका


नांदेड


प्रताप चिखलीकर पाटील (भाजप) - 4,08,977 मते,
अशोक चव्हाण (काँग्रेस) - 3,67,694
यशपाल भिंगे (वंचित आघाडी) - 1,44,586
मताधिक्य - 41,483


सांगली


संजयकाका पाटील (भाजप) - 3,49,621
विशाल पाटील (स्वाभिमानी) - 2,38,395
गोपीचंद पडळकर (वंचित आघाडी) - 1,86,752
मताधिक्य - 1,11,226


बुलडाणा


प्रताप जाधव (शिवसेना) - 3,65,158
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) - 2,72,082
बळीराम शिरसकर (वंचित आघाडी) - 1,19,236
मताधिक्य - 93,076


हातकणंगले


धैर्यशील माने (शिवसेना) - 4,88,856
राजू शेट्टी (स्वाभिमानी) 3,94,146
अस्लम सय्यद - 99,546
मताधिक्य- 94,710


परभणी


संजय जाधव (शिवसेना)- 3,90,001
राजेश विटेकर (राष्ट्रवादी)- 3,73,492
आलमगीर खान- 1,11,561
मताधिक्य- 1,11,561


यवतमाळ


भावना गवळी - 3,25,251
माणिकराव ठाकरे (काँग्रेस) - 2,69,७४७747
प्रवीण पवार - 64,776
मताधिक्य- 55,504