Solapur Loksabha : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेनी दणदणीत विजय मिळवलाय. भाजप उमेदवार राम सातपुतेंचा (Ram Satpute) सोलापुरात दारुण पराभव झालाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. तर राम सातपुतेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. मात्र, पीएम मोदींच्या सभा फ्लॉप ठरल्या आहेत. प्रणिती शिंदेचा सोलापुरात दणदणीत विजय मिळवलाय. 


राम सातपुते काय म्हणाले होते?


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राम सातपुते यांनी धर्मा माने यांना तुमच्या गावातून लीड पाहिजे. भाजपने तुमच्या गावासाठी निधी दिलाय, असं ठणकावून सांगितलं होतं. लीड देण्यासाठी राम सातपुतेंनी आवाहन केलं होतं. त्यानंतर राम सातपुते यांना लोकांना रोषाला सामोरे जावे लागले होते. राम सातपुते कार्यकर्त्यांना दमदाटी करतात, असा आरोपही राम सातपुते यांच्यावर केला होता. त्यावर राम सातपुते यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.  माझ्या घरातले, आणि हक्काचे कार्यकर्ते आहेत, मला त्यांना बोलण्याचा हक्क आहे, असं राम सातपुतेंनी म्हटलं होतं. 






धर्मा मानेंच्या गावातून लीड किती? सोशल मीडियावर मीम्स व्हायरल 


दरम्यान, प्रणिती शिंदे यांना लीड मिळाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. धर्मा मानेंच्या गावातून प्रणिती शिदेंना लीड किती? असा विचारणा करत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पराभव झाल्यानंतर राम सातपुतेंना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापुरात तिरंगी लढत पाहायला मिळत होती. काँग्रेसने प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर वंचितनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. 2019 मध्ये वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, पण त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. यंदा मात्र प्रकाश आंबेडकर यांनी वचिंतकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होतं. मात्र, गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वचिंतने अपक्ष उमेदवार अतिष बनसोड यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकी चालली नसल्याचे दिसले.  






इतर महत्वाच्या बातम्या 


Hatkanangale Lok Sabha Result 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या धैयशील मानेंचा विजय, ठाकरेंच्या सत्यजीत पाटलांचा 14 हजार मतांनी पराभव