केरळमध्ये व्हीव्हीपॅट मशिनमध्ये साप, काही काळ मतदान स्थगित
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2019 08:42 PM (IST)
मय्यिल कंदक्कई क्षेत्रातील एका बूथमध्ये एक छोटासा साप व्हीव्हीपॅट मशिनमध्ये घुसला होता. सापाला बघून मतदारांची भीतीने गाळण उडाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही काळासाठी मतदान थांबवलं.
प्रातिनिधिक फोटो
तिरुअनंतपुरम : लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यात केरळमध्ये मतदान पार पडलं. मात्र केरळमधील कन्नूर मतदारसंघातील एका बूथवर आलेल्या अनाहूत पाहुण्यामुळे मतदान काही काळ रखडलं होतं. व्हीव्हीपॅट मशिनमध्ये साप शिरल्यामुळे मतदान काही वेळासाठी थांबवण्यात आलं होत. मय्यिल कंदक्कई क्षेत्रातील एका बूथमध्ये एक छोटासा साप व्हीव्हीपॅट मशिनमध्ये घुसला होता. सापाला बघून मतदारांची भीतीने गाळण उडाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही काळासाठी मतदान थांबवलं. सापाला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर मतदान पुन्हा सुरु करण्यात आलं. मय्यिल कंदक्कईमधील संबंधित बूथवर खरं तर सुरुवातीपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. विद्यमान खासदार पीके श्रीमती (भाकप-एलडीएफ), के सुरेंद्रन (काँग्रेस-यूडीएफ) आणि सीके पद्मनाभन (भाजप) यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा असून एकाच टप्प्यात सर्व जागांवर मतदान पार पडलं. राज्यात दिवसभरात 70.21 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.