नवी दिल्ली : चार पैकी तीन राज्यांमध्ये कलांनुसार (Election Result 2023)  भाजपला (BJP)  बहुमत मिळाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपने  मोठी मुसंडी मारली आहे.तीन राज्यातल्या विजयानंतर  भाजप कार्यालयात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी या विजयानंतर ट्वीट करत विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi)  दिले आहे. एक अकेला सब पर भारी म्हणत हे मोदी मॅजिक असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. 


स्मृती इराणी यांनी नरेंद्र मोदीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहे देश बघत आहे एक अकेला अनेकांना भारी पडत आहे. नरेंद्र मोदी यांचे हे भाषण लोकसभेतील आहे. हे भाषण जुने असून त्याचा व्हिडीओ आता शेअर करत विजयाचे श्रेय नरेंद्र मोदींना दिले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, देशात एकच गॅरंटी मिळते ती म्हणजे मोदी गॅरंटी आहे






राजस्थानात कलांनुसार भाजप 111 जागांसह आघाडीवर


राजस्थानात भाजपने कलांनुसार बहुमताचा आकडा पार केला. राजस्थानात विद्यमान काँग्रेस सरकारला मतदारांनी नाकारल्याचं चित्रं दिसतंय. कलांनुसार भाजप 111 जागांसह आघाडीवर आहे तर काँग्रेसला केवळ 68 जागांपर्यंत मजल मारता आलीय. 


मध्यप्रदेशमध्ये भाजपची बहुमताच्या आकड्यासह मोठी मुसंडी


मध्यप्रदेशमध्ये भाजपनं बहुमताच्या आकड्यासह मोठी मुसंडी मारली आहे. कलांनुसार भाजपने 158 जागांवर मुसंडी मारलीय. शिवराजसिंह चौहान सरकारवर मतदारांनी पुन्हा विश्वास टाकल्याचं दिसतंय. तर कलांनुसार काँग्रेसला केवळ 70 जागांपर्यंत मजल मारता आलीय. 


छत्तीसगडमध्ये भाजप 52  जागांवर आघाडीवर


छत्तीसगडमध्ये कलांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र आता निकालांचं चित्रं स्पष्ट होताना दिसतंय. छत्तीसगडमध्ये भाजप 52  जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला 36 जागांवर आघाडी मिळालीय.राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. 


तेलंगणात सध्याच्या कलांनुसार काँग्रेसला 68 जागांवर यश


तेलंगणात काँग्रेसने यश मिळवलंय. तेलंगणात सध्याच्या कलांनुसार काँग्रेसला 68 जागांवर यश मिळालंय, तर बीआरएसची 39 जागांवर पिछेहाट झालीय. भाजपला तेलंगणात केवळ नऊ जागांवर आघाडी मिळालीय. 


हे ही वाचा :


Sanjay Raut: पाचही राज्यांमध्ये भाजपचा दावा म्हणजे मोठा विनोद, संजय राऊतांची टीका