Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल (Vidhan Sabha Election Result 2024) आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सिंधुदुर्गात मालवणमधील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला उभारला आणि आरमाराची देखील स्थापना केली म्हणूनच भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधलं जातं. सिंधुदुर्ग जिल्हा हा ऐतिहासिकच नाही तर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारी हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. त्यासोबतच हिरवागार निसर्ग, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा हा पर्यटकांना आकर्षित करतो. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली अशी एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतरदार संघातील प्रमुख लढती 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ  महायुती उमेदवार  महाविकास आघाडी वंचित/ अपक्ष/ इतर  विजयी उमेदवार
1. कुडाळ निलेश नारायण राणे (शिवसेना शिंदे गट) वैभव विजय नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी),  अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी) निलेश नारायण राणे (शिवसेना शिंदे गट)
2. सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट) राजन कृष्णा तेली (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विशाल प्रभाकर परब (अपक्ष), अर्चना संदीप घारे (अपक्ष) दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट)
3. कणकवली नितेश राणे (भाजप) संदेश भास्कर पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी) नितेश राणे (भाजप)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 

कुडाळ विधानसभा -

रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी), विरुद्ध वैभव विजय नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),  विरुद्ध निलेश नारायण राणे (शिवसेना), विरुद्ध अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), 

सावंतवाडी विधानसभा -

दिपक वसंतराव केसरकर (शिवसेना), विरुद्ध राजन कृष्णा तेली (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विरुद्ध अर्चना संदीप घारे (अपक्ष), विरुद्ध विशाल प्रभाकर परब (अपक्ष)

कणकवली विधानसभा -

चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी),  विरुद्ध नितेश नारायण राणे (भाजप), विरुद्ध संदेश भास्कर पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)