शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादीत सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम या मंत्र्यांचा समावेश आहे. अभिनय क्षेत्रातून राजकारणात उडी घेतलेले प्रख्यात अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकरही या यादीत आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या नितीन बानुगडे पाटील यांच्या भाषणांना नेहमी गर्दी होत असते.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण?
उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे
सुभाष देसाई
दिवाकर रावते
रामदास कदम
संजय राऊत
अनंत गीते
आनंदराव अडसूळ
चंद्रकांत खैरे
एकनाथ शिंदे
आदेश बांदेकर
गुलाबराव पाटील
विजय शिवतारे
सुर्यकांत महाडिक
विनोद घोसाळकर
डॉ. नीलम गोऱ्हे
लक्ष्मण वडले
नितीन बानुगडे पाटील
वरुण सरदेसाई
राहुल लोंढे
यापूर्वी भाजप, काँग्रेसनेही देशभरातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, रावसाहेब दानवे, विनोद तावडे यासारख्या नेत्यांची नावं आहेत.