सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही दिवसांपासून माढ्याच्या उमेदवारीवरुन रणकंदन सुरु आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण माढ्यातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर माढा लोकसभेला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. परंतु दररोज माढा लोकसभेवरुन वातावरण तापत आहे.


माढ्यात नेमकं काय नाट्य झालं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात माढा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला
त्यानंतर पवार घराण्यातील तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नको असे सांगत शरद पवारांनी माघार घेतली
माघार घेताना विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढवावी असे पवारांनी जाहीर केले
परंतु विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचा मुलगा रणजितसिंह यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आणि माढ्यातील राजकारण बदलले
रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला माढ्यातील स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला
विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या साखर कारखान्याने पैसे थकवल्याने त्यांच्याबद्दल माढ्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, हे विरोधामागचे प्रमुख कारण

संजय शिंदे हे भाजपाच्या मदतीने सोलापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी बसले असून ते राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू आहेत
माढ्याबाबत मुंबईत रामराजे निंबाळकर यांनी बैठक बोलवली होती त्याला बबन शिंदे उपस्थित नव्हते. कारण मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता
शरद पवार गेल्या काही महिन्यांपासून संजयमामा शिंदे यांचे जाहीर कार्यक्रमातून कौतुक करत आहेत.
शरद पवारांची ही खेळी सुरु असताना दुसऱ्या बाजूला मोहिते-पाटील भाजपाच्या संपर्कात होते
विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीशी संपर्क तोडला आणि दोन दिवसात रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
रणजितसिंहांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी नाराज होईल असे वाटत होते. परंतु सुंटीवाचून खोकला गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होती
मोहिते पाटील स्वतःहून दूर झाल्याने संजय शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले
मोहिते पाटील नाट्य सुरू असताना भाजपनेही संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही
अखेरीस आज शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय मामा शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे
सोलापूरात समविचारी आघाडी असून त्यात माढा-करमाळ्याचे संजय शिंदे यांच्यासह माळशिरसचे उत्तम जानकर, सांगोल्याचे शहाजी पाटील, माणचे जयकुमार गोरे, फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांचा समावेश आहे
या सगळ्यांची मदत संजय शिंदे यांना होण्याची शक्यता असून याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद आणि मोहिते-पाटील यांच्याविरोधातील गट संजय शिंदेच्या पाठिशी असणार आहे
त्यामुळे माढ्यातील लढत चुरशीच्या लढतीपैकी एक असणार आहे

व्हिडीओ पाहा