मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असतानाच मुंबई महापालिकेतही सेना-भाजपचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीएमसीतील विविध समित्यांच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेला मदत करणार आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज भरताना भाजपचे गटनेते मनोज कोटक हजर होते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिवसेनेसोबत मैत्र कायम ठेवताना सत्तेच्या बाहेर राहून पहारा देण्याचीच भूमिका कायम ठेवणं पसंत केलं आहे.
लोकसभेसाठी युती झाल्यानंतरही पालिकेतील सत्तेच्या वाट्यावर पाणी सोडलं. मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुका 3 एप्रिलला आहेत. विविध समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांचे कुर्ला येथील भूखंड प्रकरण त्यांना चांगलंच भोवल्याचं दिसत आहे. त्यांची समिती अध्यक्ष पदावरुन गच्छंती झाली आहे.
मुंबई महापालिका समिती उमेदवार
1) स्थायी समिती- यशवंत जाधव
2) बेस्ट समिती- अनिल पाटणकर
3) शिक्षण समिती- अंजली नाईक
4) सुधार समिती- सदा परब
मुंबई महापालिकेत सेना-भाजपचं मनोमिलन, समिती निवडणुकीत भाजपची शिवसेनेला मदत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Apr 2019 07:11 PM (IST)
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिवसेनेसोबत मैत्र कायम ठेवताना सत्तेच्या बाहेर राहून पहारा देण्याचीच भूमिका कायम ठेवणं पसंत केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -