Aaditya Thackeray : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आल्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या वणीमध्ये प्रचारासाठी पोहोचल्यानंतर हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅग तपासण्यात आली. बॅग तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातूनही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, माझी बॅग तपासण्यात काही अडचण नाही, पण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या बॅग तपासल्या होत्या का?  दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून हल्लाबोल केला आहे. 


महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! हो


आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धवसाहेबांच्या सामानाची आज वणी इथे तपासणी करण्यात आली. जे कायद्याला धरुन ते झालंच पाहिजे!  पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून जो समानतेचा हक्क भारतीयांना दिलाय, तो सगळ्यांना लागू व्हायला हवा! कायदा सगळ्यांना समान हवा! महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! होऊन जाऊ दे 'दूध का दूध और पानी का पानी!'






सात-आठ अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली 


दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले, मी प्रचारासाठी आलो तेव्हा सात-आठ अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना परवानगी दिली. मी त्याचा व्हिडिओ बनवला. मात्र आतापासून कोणाची बॅग तपासली तर आधी त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासून तो कोणत्या पदावर आहे याची माहिती घ्या. ते पुढे म्हणाले की, "जसे ते तुमचे खिसे तपासतात तसे त्यांचेही तपासा." हा तुमचा हक्क आहे. तपास अधिकाऱ्याने अडवले तर त्याचे खिसेही तपासा. माझी बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर मला राग आला नाही. "जशी त्यांनी माझी बॅग तपासली, तशीच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची बॅग तपासण्याची हिंमत दाखवावी."  



इतर महत्वाच्या बातम्या