Former MLA Sadanand Chavan : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग ( (Maharashtra Vidhansabha Election 2024) आला आहे. राजडकीय नेते ऐकमेकांच्या गाठीभेटी घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण (Former MLA Sadanand Chavan) हे शिवसेनेत (Shiv Sena) नाराज आहेत. चिपळूण संगमेश्वर जागेच्या निर्णयात विश्वासात न घेतल्याने सदानंद चव्हाण हे नाराज आहेत. पक्ष प्रवेशाच्या वेळी उमेदवारीचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं राजकीय पुनर्वसनाचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळं नाराज सदानंद चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. 


सदानंद चव्हाण वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत?


दरम्यान, योग्य निर्णय न झाल्यास  सदानंद चव्हाण वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सदानंद चव्हाण हे भूमिका जाहीर करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदारांच्या जाहीर नाराजीमुळं चिपळूण मधील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.


काही जागांवर महायुतीकडून मनसेला पाठिंबा दिला जाणार?


महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सात उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला असून राज्यातील जवळपास सर्वंच जागांवर उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आता काही जागांवर महायुतीकडून मनसेला पाठिंबा दिला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. एका बाजूला जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच राड ठाकरेंना काही जागांवर पाठिंबा देण्याची शक्यता असल्यानं पुन्हा त्या ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळं तिकीट वाटप होईपर्यंत पुढची राजकीय समीकरण काय असणार हे सांगता येणार नाही.


20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार


महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांची पहिली यादी कधी जाहीर होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या भेटीसाठी कोण कोण आलं?