Bigg Boss 18: बिग बॉसचा प्रत्येक सिझन प्रेक्षकांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असतोच. यावेळी तर पहिल्या दिवसांपासूनच वेगवेगळ्या कारणावरून हा शो वादग्रस्त ठरलाय. आधी गुणरत्न सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्यांनी, नंतर भांडणांनी तर नंतर सलमान खानला मिळणाऱ्या धमकी प्रकरणानं. आता मात्र प्रेक्षकांचं लक्ष घरातल्या एका लव्हस्टोरीकडे लागलेय. बिग बॉसच्या घरात आता प्रेमाची फुले फुलू लागलीयेत. आतापर्यंत घरातील सोबती स्पर्धकांची नावं जोडली जात होती पण आता घरात खरीच जोडी बनताना दिसत आहे. कोण आहेत हे स्पर्धक?
बिग बॉसमध्ये अलिकडेच झालेल्या एपिसोडमध्ये चाहत पांडेचे नाव करणवीर मेहरा आणि नायरा बॅनर्जीचे नाव शेहजादा धामीसोबत जोडले जात होते. पण आता अशात बिगबॉसच्या घरातील अशाच दोन स्पर्धकांमध्ये झालेली जवळीक साऱ्यांच्या नजरेस दिसू लागली आहे. अलिकडेच या दोन स्पर्धकांच्या काही खास क्षणांचे व्हिडिओही निर्मात्यांनी शेअर केले होते. या स्पर्धकांचं नाव आहे ईशा सिंह आणि बिग बॉसचा संतापी अविनाश मिश्रा यांच्या मैत्रीची. घरातील सदस्यांना या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळं असल्याची चर्चा सुरु आहे.
व्हिडीओही आलेत समोर
कलर्स टीव्हीनं अधिकृत पेजवरून याविषयी एक प्रोमोही शेअर केलाय. या दोघांचे चाहतेही या दोघांचे व्हिडीओ समोर येत आहे.
अविनाश ईशाची जवळीक चर्चेचा विषय
अविनाश आणि ईशाच्या संभाषणाचा एक रोमँटिक संभाषणाचा एक व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे. या दोघांच्या चाहत्यांनाही अविनाश आणि ईशाचं बाँडींग आवडलं आहे. बिग बॉस 18 मध्ये ईशा सिंह, एलिस आणि अविनाश मिश्रा यांच्यात चांगली मैत्री आहे. तिघेही एकमेकांशी चांगले बाँन्डीग शेअर करतात. ईशा आणि अविनाश एकमेकांची खूप काळजी घेतानाही दिसतात. अलीकडेच अविनाशच्या अचानक एक्झिट झाल्याच्या बातमीने ईशा खूप उदास दिसत होती. अविनाशला काही काळ घराबाहेर हाकलून देण्यात आले आणि नंतर तो परतला. दुसरीकडे, अलीकडेच त्याची करणवीर मेहरासोबतही जोरदार झुंज पाहायला मिळाली.
हेही वाचा:
Bigg Boss 18: रजत आरफीन आमनेसामने, एकमेकांवर कुरघोडी करत कोण होणार बिग बॉसचा नवा टाईम गॉड?