अमरावती : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतरसुद्धा सत्ताधारी भाजप-शिवसेनेची यादी जाहीर झालेली नाही. यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी युतीच्या महामेळाव्यांना सुरुवात झाली आहे. काल अमरावतीत युतीच्या झालेल्या मेळाव्यात वाशीममधून भावना गवळी, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, तर रामटेकमधून कृपाल तुमाने यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी या नावाला दुजोरा दिला.


अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी अमरावती विभागाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली.

VIDEO | दहा मिनिटांत निवडणुकीची खबरबात | वारे निवडणुकीचे | एबीपी माझा



भाजप शिवसेना युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. ती कधीही तुटणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी इशारा दिला. युती होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात टाकून ठेवले होते मात्र आता युती झाल्यानंतर अनेकांनी युतीला घाबरून निवडणुकीमधून माघार घ्यायला सुरुवात केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शिवसेना-भाजप युती ही देशातील आशा आहे आणि ती आशा संपली तर देशात अंधार पसरेल. आपणं आजपर्यंत जे काही केलं ते उघड उघड केलं. मनाला पटत नसेल ते बोलायचो. संघर्ष झाला तो केवळ राज्याच्या हितासाठी झाला असे मतं यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलं. भाजप-सेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या पाहता टीका करावी तरी कुणावर, आज ज्याच्यांवर टीका केली तो उद्या भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश घेतो त्यामुळे टीका करताना पंचाईत होते. थोडे तरी विरोधक राहू द्या सर्वाना आपल्या पक्षात घेऊ नका असा टोलाही यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

VIDEO | उद्धव ठाकरेंची सभेत बालाकोटची उजळणी मात्र मुंबईकरांची आठवण नाही | एबीपी माझा



संबंधित बातम्या

भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होणार, मोदींच्या जागेच्या घोषणेची शक्यता

शरद पवारांना भाजपत घेऊ नका : उद्धव ठाकरे

खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला संभाजी-शिवाजी सांगायचं काम करु नये, शिवसेनेची अमोल कोल्हेंवर टीका

CSMT पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूसही नाही, उद्धव ठाकरे प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर

बालकांनी काहीही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला