राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी बंडखोरी करत हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. ते बंडखोर नेते भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांना दमदाटी करत असल्याचं शरद पवार यांना समजले होते. यानंतर पवारांनी त्यांना एक प्रकारे सज्जड दमच दिला आहे.
कितीही खटले दाखल करा, पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही : शरद पवार
इंदापूर विधानसभेच्या आघाडीचा तिकीटाचा घोळ राज्यभर गाजला होता. पवारांनी विश्वासघात केला असे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपात गेले. त्यावर आज पहिल्यांदा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले इंदापूर विधानसभेची चर्चा माझ्याशी झाली होती. हर्षवर्धन पाटील यांना मी थांबायला सांगितले होते. यातून मार्ग काढण्यासाठी मी दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर बोललो देखील होतो. भरणेही थांबायला तयार होते, असे शरद पवार म्हणाले. मग मी हर्षवर्धन पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पाटील यांना सात-आठ वेळा फोन आणि मेसेज केले. मात्र तरी संपर्क झाला नाही. मग मी त्यांची कन्या अंकिता पाटील यांना संपर्क साधला आणि हर्षवर्धन पाटील यांना निरोप देण्यास सांगितले मात्र तिकडून उत्तर आले नाही. काही दिवसानंतर ते वर्षा बंगल्यावर जात भाजपात गेल्याचे कळले, असे पवार यांनी सांगितले.
'अरे तो माझाही बाप आहे, हे विसरु नका', सुप्रिया सुळेंचं उत्तर आणि एकच हशा
इंदापूर तालुका हा 1952 पासून गांधी व नेहरू यांना मानणारा तालुका आहे. पाटील यांचे चुलते स्वर्गीय शंकरराव पाटील उर्फ भाऊ आणि स्वर्गीय आमदार राजेंद्र घोलप तसेच स्वर्गीय गणपतराव पाटील यांनी कधीही तत्वे सोडली नाहीत, प्रामाणिकता जोपासली. पाटील यांनी वेगळा मार्ग स्वीकारल्याने शंकराव पाटील उर्फ भाऊ यांना काय वाटत असेल असा टोमणा शरद पवारांनी मारला.