पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत वकील संघटनेच्या मेळाव्याला यावेळी संबोधित केलं. यावेळी त्यांनी संविधान बदलाचा मुद्दा, महाराष्ट्राची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यावर भाष्य केलं. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. बारामतीकरांना उद्देशून बोलताना तुम्ही मला दरवेळी निवडून दिलं घरी पाठवलं नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.
सत्ताधारी लोकांना संविधानात बदल करायचा होता.हेगडेंसारख्या काहींनी तशी भाषणं देखील केली होती. मोदींनी सांगितले 400 पार द्या का ते सांगितले नाही. संविधानात बदल करायचा असेल तर तो आकडा 400 पार पाहिजे म्हणून तो सांगितला गेला होता. मात्र, लोकं आपल्यापेक्षा हुशार लोकांनी सत्ता दिली पण 400 पारची ताकद दिली नाही, असं शरद पवार म्हणाले.
राज्यात आपण 5 वर्षात 3 मुख्यमंत्री पाहिले. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. त्यांच्या सरकारमध्ये ते मंत्रिमंडळ मध्ये होते. मी त्यांचे भाषण ऐकत होतो. ते म्हणाले मागच्या सरकारने चुका केल्या. पण ते हे विसरले की ते मागच्या मंत्रिमंडळामध्ये होते.
महाराष्ट्र हे 1 नंबरवरुन 6 वर गेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था याबाबत महाराष्ट्रचा नंबर खाली गेला आहे. आज स्त्रियांना सुरक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलापूर प्रकरणात ज्यांच्यावर प्रशासन ठेवायची जबाबदारी आहे त्यांच्यावर आरोप केले गेले याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कायदा केला होता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींना अधिकार द्यायचा, याची आठवण देखील शरद पवार यांनी करुन दिली.
कुठंही काम करण्याची भूमिका गुजराती, तामिळनाडू, पंजाब मधील माणसाने घेतली. पण मराठी माणूस बाहेर जायचं म्हटलं की कपाळावर अट्या पडतो. त्यामुळे शेती कमी झाली, असं शरद पवार म्हणाले. आज विकासाच्या पध्दतीने काम होत नाही. काही लोकं करतात. काही जण म्हणतात विकासासाठी पक्ष सोडला, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला.
सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीमध्ये मी कधीही पाहिले नाही असं झालं.पैशाचा गैरवापर झाला. रात्री बँक उघडी ठेवली. हे कधीही लोकसभेला पाहिले. देणाऱ्या पेक्षा घेणारे शहाणे निघाले, असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदेंना शरद पवार काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं ते म्हणतात आम्ही देता आहोत घेता नाही. लोकांचा मताचा अधिकार खरेदी करण्यासाठी देऊ नका, एवढंच म्हणनं आहे. लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करायचा असेल तर माझी काही हरकत नाही.. पण त्याचा वापर संसदीय पद्धती उद्धवस्त करण्यासाठी होऊ नये, यासाठी आग्रह आहे, असं शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :