Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुतीमधील जागावाटपाची (Mahayuti Seat Sharing) आकडेवारी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही, काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात याची उत्सुकता आहे. किमान जागा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका अजित पवार यांनी मांडली असून, मुख्यमंत्री शिंदे गटालाही अधिक जागा हव्या असल्याने तिढा वाढण्याची शक्यता आहे. महायुतीत जागावाटपात शिंदे गट राष्ट्रवादीवर वरचढ ठरतो की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
असे असले तरी राज्याच्या राजकारणात महत्वाचा ठरलेला विदर्भात भाजपचाच बोलबाला असल्याचे बघायला मिळाले आहे. तर एकट्या उपराजधानी नागपुरातील 12 विधानसभा क्षेत्रांपैकी 11 मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा असल्याचे चित्रा आहे. तर एकट्या रामटेकच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाला समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नागपुरात (Nagpur) कुठेही स्थान नाही. त्यामुळे आगामी काळात भाजप किती जागांवर विजय संपादन करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उमरेड विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स अखेर संपला
दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना भाजपने आपली चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. उमरेड मध्ये भाजपचा उमेदवार राहील की शिंदेंच्या शिवसेनेचा असा प्रश्न गेले काही दिवसांपासून कायम होता. मात्र आज भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी देऊन उमरेड मध्ये भाजपचाच उमेदवार राहील हे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने काँग्रेसचे उमरेड चे तत्कालीन आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेत उमेदवारी दिली होती.
मात्र राजू पारवे निवडणुकीत पराभूत झाले. तेव्हापासून ते उमरेड मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे सुधीर पारवे या मतदारसंघातून इच्छुक होते. एकनाथ शिंदे यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघसाठी खूप जोर लावला होता. मात्र अखेरीस उमरेड ची जागा महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्याच वाट्यात आली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रांपैकी रामटेक वगळता सर्व 11 मतदारसंघात भाजपची उमेदवार आहेत.
हे ही वाचा