Maharashtra Election Result Live Updates :कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्यांदा पोस्टल मतदान मोजलं जाणार आहे. दरम्यान, कडक बंदोबंदास्त बंदिस्त असलेल्या स्ट्राँग रुम उघडल्या आहेत. सुरवातीच्या टपाली मतदानामध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज आघाडीवर आहेत. कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे. 






मतमोजणीसाठी 686 कर्मचारी नियुक्त, पोलीस विभागाची सुरक्षा 


दरम्यान, निवडणुकीचा निकाल शांततेत व वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 349 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 337 कर्मचारी असे एकुण 986 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अतिरिक्त 10 टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असणार आहेत. रमणमळा मतमोजणी केंद्र ठिकाणी 600 व राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्र ठिकाणी 600 पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहेत. 


कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या असून चंदगड 28, राधानगरी 31, कागल 26, कोल्हापूर दक्षिण 24, करवीर 26 आणि कोल्हापूर उत्तरची 23 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. 


हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या असून शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी 24, इचलकरंजी 19, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी 21 तर शिरोळसाठी 24 फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे़. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, ऑडिओ व्हीडीओ रेकॉर्डर- पेन आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे.


इतर महत्वाच्या बातम्या