मुंबई : जनादेश झुगारून एनडीए (NDA) सरकार बनवत आहेत, आम्ही  योग्य वेळी पाऊल उचलू, असं मोठ वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. दिल्लीत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की,  इंडिया आघाडीच्या बैठकीला 28 पक्षाचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. 


जनादेश इंडिया आघाडीकडे, त्यानुसार योग्य वेळी पाऊलं उचलू


बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी म्हटलं आहे की, कालच निकाल लागला आहे. निकाल उत्तम लागले आहेत. हा जनादेश इंडिया आघाडीकडे आहे. हा जनादेश झुगारून ते सरकार बनवत आहेत. लोकांच्या मनात इच्छा आहे आहे, त्यानुसार योग्य वेळी आम्ही पाऊल उचलू, असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.


आघाडी यशस्वी झाली की नाही, हे पुढच्या सहा महिन्यात समजेल


ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीच्या आहेत, त्या कुठेही गेल्या नाहीत. त्या-त्या राज्यातील ती परिस्थिती आहे. निमंत्रक असावा अशी भूमिका काही लोकांनी घेतली त्यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचं मत अरविंद सावंत यांनी बैठकीत मांडलं. आज आकडा आमच्याकडे नाही, पण पुढे त्यावर विचार करू. त्यांची आघाडी यशस्वी झाली की नाही हे पुढच्या सहा महिन्यात समजेल, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.


अनेक पक्ष आमच्या संपर्कात


एनडीएला समर्थन देणारे अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे आता घेणार नाही, पण हे पुढच्या सहा महिन्यात समजेल. वेगवेगळ्या पक्षाच्या संपर्कात ते नेते आहेत. या देशातील जनतेने संविधान बदलणाऱ्याना पराभूत केलं. अयोध्या, चित्रकूट या दोन्ही श्रीरामाच्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.


इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक


दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची (INDIA Alliance) बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया अलायन्समधील विविध विरोधी पक्षांचे नेते आणि मान्यवर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या समाधानकारक निकालांवर लक्ष केंद्रित करून चर्चेसाठी एकत्र आले होते. आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्राच्या समृद्ध भविष्याची खात्री करण्यासाठी हा सहयोगी प्रयत्न महत्त्वपूर्ण आहे, असं ट्वीट शरद पवार यांनी बैठकीनंतर केलं आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : 8 जूनला मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता