मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) 8 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार, अशी एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि यांच्यासह मंत्र्यांचा देखील शपथविधी त्याच दिवशी पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


नरेंद्र मोदी 8 जूनला यांचा शपथविधी


विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 जूनला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 7 आणि 8 जूनला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज दिल्लीमध्ये एनडीएची सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली.


मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार


लोकसभा निवडणुकीत एनडीएने (NDA) 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला आहे, त्यामुळे ते लगेचच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला. नरेंद्र मोदी सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. 


दिल्लीत एनडीएची बैठक


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत बुधवारी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या सर्व पक्षांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पाठिंब्याचं पत्र सुपुर्द केलं. एएनआय  वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आता 7 जून रोजी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीनंतर सर्व मित्रपक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.


नितीश आणि चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएनला समर्थन पत्र दिलं 



एनडीएनला नितीश कुमार (Nitish Kumar) आणि चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी समर्थन पत्र दिलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आपल्या पक्षाचं समर्थन पत्र दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. सर्वाचं समर्थन आणि सह्या घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : सत्तास्थापनेसाठी योग्य वेळी पाऊलं उचलणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य