Sanjay Raut On Amit Thackeray: गेल्यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वरळीतून निवडणुकीसाठी उभा होता , तेव्हा मी मनाने उमेदवार नाही दिला. त्यावेळी मी विचार केला की नाही आमच्या घरातील उमेदवार आहे, मी वरळीला उमेदवार देणार नाही. वरळीत मनसेची 38 हजार मतं आहेत. पण मी हे सर्व माझ्या मनाने केलं आणि मी केलं म्हणून तुम्हीही करायला हवं, असं मला वाटत नाही, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते. तसेच मी कुटुंबाच्या आड राजकारण आणत नाही, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरेंच्या या विधानावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


काका उद्धव ठाकरेंनी पुतण्या अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याविरोधात दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी दिली. यावर संजय राऊत म्हणाले की, कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी त्यांचा प्रश्न आहे. कोणी कुठे लढावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही इतकंच म्हणालो, दादर, माहीम, प्रभादेवी येथे शिवसेनेचा जन्म झालाय. हे शिवसेनेचं जन्मस्थान आहे. आम्हाला जन्मस्थान असं कोणाला देता येणार नाही. अनेक भावनिक विषय राजकारणतात असतात, त्यामध्ये दादर आहे. इथे शिवसेनेचा जन्म झाला, 77 ए रानडे रोड, हा शिवसेनेचा पत्ता होता. त्या मतदारसंघात आम्हाला लढावं लागेल इतकीच आमची भूमिका होती, असं संजय राऊतांनी स्पष्ट केले. तसेच आणखी कोणता पक्ष लढत असेल तिकडे तर तो त्यांचा प्रश्न आहे, असंही संजय राऊतांनी सांगितले.


राज ठाकरेंची दादर-माहीमकरांना भावनिक साद- 


सामनाकडे येताना मला सर्व फ्लॅशबॅक येत होते, सर्व जुना काळ समोर येत होता. पाहिले साप्ताहिक काढले बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी तो मार्मिक तो इथल्या प्रभादेवीच्या प्रेस मधून...इथूनच सामना निर्माण झाला. पाहिले पाक्षिक सुरू केले त्याचे नाव  प्रबोधन होते. प्रबोधनमुळे माझ्या आजोबांना प्रबोधनकार म्हणून ओळखले गेले. दादरमध्ये साप्ताहिक सुरू झाले होते, मराठामध्ये बाळासाहेब आणि नवयुगमध्ये माझे वडील व्यंगचित्र करत होते. हे सुरू असताना पुन्हा मार्मिक सुरू झाले. मराठी माणसावर जो अन्याय होत होता, तो त्यात आला. त्यात होत वाचा आणि थंड बसा मात्र नंतर आले की वाचा आणि पेटून उठा...1985 साली बाळासाहेबांनी व्यंगचित्र करणे बंद केले ,त्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली. लोकसत्ता, सामनामध्ये देखील माझे व्यंगचित्र चालू झाली. हे सगळे सांगायचं विचार का आला तर याची सुरुवात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी केली. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली , अनेक आमदार झाले. पण यंदा जे आधी घडले नाही ते आता घडतंय, आज दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय, अशी भावनिक साद मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घातली.


संजय राऊत नेमकं काय म्हणाले?, Video:



संबंधित बातमी:


Raj Thackeray: सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं यामगचं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर