Sanjay Raut: मुंबईची लढाई आता सुरू झाली आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही. महापालिका जिंकली आणि लढाई थांबली असं नाही. केंद्रामधील राक्षसी सत्ता, महाराष्ट्रामधली मराठीद्रोही सत्ता काही धनदांडगे यांना मिळून मुंबई मोदींच्या आणि अमित शाहांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे आणि ती लढाई मोठी लढाई आणि बराच काळ चालणारी लढाई असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की, महापालिका हे त्या युद्धातील पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे. लढाई महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल. आज देशाचं नव्हे तर जगातील अनेकांचं लक्ष मुंबईत काय होणार, मुंबईवर कोणाचा ताबा असेल कोण जिंकेल याकडे नक्कीच लागलंय. कदाचित प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा आजच्या मतदानाकडे लक्ष ठेवून असतील.
आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
ते म्हणाले की, एकदा मुंबई गिळली का मुंबई वेगळी केली जाईल मराठी माणसापासून हृदय तोडलं जाईल महाराष्ट्राचे. यासाठी आम्हाला सज्ज राहावं लागेल जर 106 हुतात्मे तेव्हा झाले असतील तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे मराठीची मशाल पेटली आहे हृदयात ते सगळे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
मराठी माणूस जागा झाला आहे
त्यांनी पुढे सांगितले की, मराठी माणूस जागा झाला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जे वादळ निर्माण केलं. गेल्या एक महिन्यामध्ये मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झाला आहे आणि तो मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मतदान करणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष सत्ता आणि पैसा यासाठी एकत्र आले आहेत, त्यांना मुंबई आणि मराठी माणसाचं काहीही पडलेलं नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी मनाला साद घातली असल्याचे ते म्हणाले. अजित पवार भारतीय जनता पक्षाचा 40 हजार कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडतायत. अशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी अराजक आणि बेबंदशाही माजली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
त्या भूखंडावर सुद्धा अदानीचा बोर्ड लागला
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर ते म्हणाले की, घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले, फार दुर्दैवी घटना होती. मी काल पाहिलं त्या भूखंडावर सुद्धा अदानीचा बोर्ड लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या