BMC Election 2026 मुंबई: राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान (Maharashtra Municipal Election 2026) होणार आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान नागरिकांना मतदान करता येणार आहे. मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांग लावली आहे. याचदरम्यान मुंबईतील एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदाराबाबत ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. दुबार मतदार दिसला, तर त्याला तिथेच फोडून टाका, असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत. यातच आता दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मुंबईतील पहिला दुबार मतदार आढळून आला आहे. (BMC Election 2026)
वार्ड क्रमांक 192 मध्ये नेमकं काय घडलं? (Dubar Voter Mumbai)
वार्ड क्रमांक 192 मधील मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजाविला आहे. यशवंत किल्लेदार मतदान करण्यासाठी आले असता मतदान केंदरावर दुबार मतदार ही आढळून आलेला आहे. या दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबविण्यात आले आहे. तर आधारकार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदान करून दिले जाणार आहे. यावर ही सगळी निवडणूक आयोगाची चूक असल्याचं यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. वार्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यात लढत होणार आहे. (Yashwant Killedar vs Priti Patankar 192 Ward)
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण किती उमेदवार आहेत, जाणून घ्या... (BMC Election 2026)
एकूण उमेदवार- 1700पुरुष उमेदवारृ 822महिला उमेदवार- 878
मतदान सुरळीत पार पाडावा यासाठी 64 हजार 375 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 4500 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. मतदानासाठी दोन ठिकाणी मतदान यंत्रांचे साठवणूक करण्यात आलेली होती. विक्रोळी आणि कांदीवली या ठिकाणी ठेवण्यात आली होती. विक्रोळी गोडाऊन मध्ये ठेवलेले कंट्रोल युनिट 10800 तर बॅलेट युनिट 13500 आहेत. तर कांदिवलीतील कंट्रोल युनिट 9200 तर बॅलेट युनिट 11500 आहेत.
