Sangli loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचा ( loksabha Election) रणसंग्राम सुरु झालाय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात झालीय. मात्र, अद्याप काही जागांचा तिढा कायम असल्याचं चित्र दिसतंय. महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचा तिढा आणखी कायम आहे. कारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केलीय. मात्र, काँग्रेस काही केल्या ही जागा सोडायला तयार नाही. सांगली हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे. काँग्रेस ही जागा लढवणारच असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिलीय. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (vishal patil) हे याठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत.  दरम्यान, याच मुद्यावरुन काँग्रसचे नेते आज दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. 


उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केली


सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli loksabha Election) जागेवरुन सध्या महाविकास आघाडीत नाराजी सुरु आहे. कारण उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय. मात्र, सांगलीची जागा काँग्रेसचं लढवणार असल्याचा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतलाय. याच मुद्यावरुन आज काँग्रसचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. सांगलीची जागा कॉंग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. 


विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू


विशाल पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. मागील काही दिवसापूर्वी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. वसंतदादा पाटील यांचा विचार पैशाने निर्माण झालेला नाही आणि पैसा नाही म्हणून तो संपणार नाही, असे वक्तव्य करत विशाल पाटील यांनी आपण काँग्रसमध्येच राहणार असल्याचं सांगितलं होतं. 


महत्वाच्या बातम्या:


संजयकाकाच्या विरोधात नेमका उमेदवार कोण? सांगली मतदारसंघाबाबत मविआचा तिढ्यावरून गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली